मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

मुंबई (mumbai) महापालिकेकडून (bmc) 426 फ्लॅट्सचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार या फ्लॅट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या 426 घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झाली आहे. आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत काढण्यात आली आहे. पण असं असलं तरी या फ्लॅट्सची (flats) किंमत तुलनेने जास्त असल्याने घर घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. म्हाडाच्या (mhada) फ्लॅट्सपेक्षा ही घरे महाग असल्याने खरेदी करु इच्छिणाऱ्यांची निराशा झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुंबईत कोणत्या परिसरात किती दरांची घरे जाहीर करण्यात आली आहेत याची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. मुंबई महापालिकेने लॉटरीसाठी जाहीर केलेल्या 426 फ्लॅट्सची किंमत ही वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळी अशी आहे. भायखळ्यातील फ्लॅट्सची किंमत 1 कोटी आहे. या फ्लॅट्सची किंमत साधारपणे अंदाजे 54 लाखांपासून सुरु होते आणि ही किंमत 1 कोटीपर्यंत जाते. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी घराच्या किंमती या वेगवेगळ्या आहेत. अल्प उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न 9 लाख असणाऱ्यांसाठी कांदिवलीत 4 घरे आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत 81,79,217 इतकी आहे. तर कांजूरमार्ग येथे 27 घरे आहेत. तसेच त्यांची प्रत्येकी किंमत 97,86,392 इतकी आहे. अंधेरी पूर्वेच्या मरोळ (marol) येथे 14 घरे आहेत. तिथल्या घरांची किंमत प्रत्येकी 78,50,910 इतकी आहे. भांडूप पश्चिमेतील एलबीएस मार्ग येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 240 घरे आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत 63,50,986 इतकी आहे. कांदिवली पूर्वेत 30 घरांची प्रत्येकी किंमत 63,77,162 इतकी आहे.  या घरांची प्रत्येकी किंमत 66,40,090 रुपये इतकी आहे. भायखळाच्या प्रेस्टीज परिसरात 42 घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत 1,01,25,109 इतकी आहे. जोगेश्वरी पूर्व येथे 46 घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत 54,27,404 रुपये इतकी आहे. तसेच गोरेगावच्या पिरामल नगर येथे 19 घरे आहेत. त्या घरांची प्रत्येकी किंमत 59,15,602 रुपये इतकी आहे. या सर्व घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. https://bmchomes.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर अर्जदारांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर असणार आहे. 14 नोव्हेंहबरच्या संध्याकाळी 5 वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे. तसेच अर्ज शुल्क आणि ठेवी या 14 नोव्हेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यत स्वीकारल्या जाणार आहेत. यानंतर पात्र अर्जदारांची यादी 18 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल. तर 20 नोव्हेंबरला सोडत काढली जाईल. तसेच 21 नोव्हेंबरला लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात येईल.हेही वाचा मुंबई, ठाणे, नवी मुंबई पालिकेकडून बंपर बोनस जाहीर ऐन दिवाळीत फटाक्यांचा तुटवडा

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

मुंबई (mumbai) महापालिकेकडून (bmc) 426 फ्लॅट्सचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार या फ्लॅट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या 426 घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झाली आहे.आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत काढण्यात आली आहे. पण असं असलं तरी या फ्लॅट्सची (flats) किंमत तुलनेने जास्त असल्याने घर घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. म्हाडाच्या (mhada) फ्लॅट्सपेक्षा ही घरे महाग असल्याने खरेदी करु इच्छिणाऱ्यांची निराशा झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुंबईत कोणत्या परिसरात किती दरांची घरे जाहीर करण्यात आली आहेत याची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.मुंबई महापालिकेने लॉटरीसाठी जाहीर केलेल्या 426 फ्लॅट्सची किंमत ही वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळी अशी आहे. भायखळ्यातील फ्लॅट्सची किंमत 1 कोटी आहे. या फ्लॅट्सची किंमत साधारपणे अंदाजे 54 लाखांपासून सुरु होते आणि ही किंमत 1 कोटीपर्यंत जाते. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी घराच्या किंमती या वेगवेगळ्या आहेत.अल्प उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न 9 लाख असणाऱ्यांसाठी कांदिवलीत 4 घरे आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत 81,79,217 इतकी आहे. तर कांजूरमार्ग येथे 27 घरे आहेत.तसेच त्यांची प्रत्येकी किंमत 97,86,392 इतकी आहे. अंधेरी पूर्वेच्या मरोळ (marol) येथे 14 घरे आहेत. तिथल्या घरांची किंमत प्रत्येकी 78,50,910 इतकी आहे.भांडूप पश्चिमेतील एलबीएस मार्ग येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 240 घरे आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत 63,50,986 इतकी आहे. कांदिवली पूर्वेत 30 घरांची प्रत्येकी किंमत 63,77,162 इतकी आहे.  या घरांची प्रत्येकी किंमत 66,40,090 रुपये इतकी आहे. भायखळाच्या प्रेस्टीज परिसरात 42 घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत 1,01,25,109 इतकी आहे. जोगेश्वरी पूर्व येथे 46 घरे आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत 54,27,404 रुपये इतकी आहे. तसेच गोरेगावच्या पिरामल नगर येथे 19 घरे आहेत. त्या घरांची प्रत्येकी किंमत 59,15,602 रुपये इतकी आहे.या सर्व घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. https://bmchomes.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर अर्जदारांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर असणार आहे. 14 नोव्हेंहबरच्या संध्याकाळी 5 वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे. तसेच अर्ज शुल्क आणि ठेवी या 14 नोव्हेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यत स्वीकारल्या जाणार आहेत. यानंतर पात्र अर्जदारांची यादी 18 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल. तर 20 नोव्हेंबरला सोडत काढली जाईल. तसेच 21 नोव्हेंबरला लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात येईल.हेही वाचामुंबई, ठाणे, नवी मुंबई पालिकेकडून बंपर बोनस जाहीरऐन दिवाळीत फटाक्यांचा तुटवडा

Go to Source