सफाई कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण
हक्क-नियुक्तीपत्रांचे वितरण : प्लास्टिक रस्ता प्रकल्पाचा शुभारंभ : 90 मीटर लांब-11 मीटर रुंदीचा रस्ता 6.32 लाखातून होणार
बेळगाव : शहराची स्वच्छता करून सौंदर्य वाढविणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचे हितरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. राज्यातील 70 टक्के कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे, असे उद्गार नगर प्रशासन मंत्री रहीम खान यांनी व्यक्त केले. नगरविकास विभाग, नगर प्रशासन संचालनालय, बेंगळूर आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सेवकांच्या नियुक्ती आदेशपत्र वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. कुमार गंधर्व रंगमंदिरमध्ये कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळ्ळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांसह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या 15 सफाई कामगारांना हक्कपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता सफाई कामगारांचे स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर नवनियुक्त सफाई कामगारांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सफाई कामगारांना हक्कपत्र-नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. प्रारंभी नगरविकास खात्याचे मल्लिकार्जुन कलादगी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या सफाई कामगारांचे जीवनमान उंचावले पाहिजे. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्रवापर व्हावा, यासाठी प्लास्टिकचा वापर करून रस्ता निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पालाही मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मंत्री रहीम खान यांच्या हस्ते चालना देण्यात आली. प्लास्टिक कचऱ्यापासून पावडर तयार करणे आणि त्यापासून रस्त्याचे डांबरीकरण करणे, असा हा नवा प्रकल्प आहे. प्रायोगिक तत्त्वावर मनपाच्या समोरील रस्ता केला जाणार आहे. शहरात दररोज पाच ते सहा टन कचरा जमा होतो. शासनाच्या निर्देशनानुसार सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी या प्लास्टिकचा आता रस्ते कामासाठी वापर होणार आहे. या नवीन प्रकल्पाबाबत साऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. 90 मीटर लांब आणि 11 मीटर रुंदीचा रस्ता 6.32 लाख निधीतून तयार केला जाणार आहे. त्यामुळे शहरात या रस्त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Home महत्वाची बातमी सफाई कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण
सफाई कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण
हक्क-नियुक्तीपत्रांचे वितरण : प्लास्टिक रस्ता प्रकल्पाचा शुभारंभ : 90 मीटर लांब-11 मीटर रुंदीचा रस्ता 6.32 लाखातून होणार बेळगाव : शहराची स्वच्छता करून सौंदर्य वाढविणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचे हितरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. राज्यातील 70 टक्के कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे, असे उद्गार नगर प्रशासन मंत्री रहीम खान यांनी व्यक्त केले. नगरविकास […]