सलग चौथ्या सत्रात घसरण कायम

सेन्सेक्स 455 तर निफ्टी 152 अंकांनी नुकसानीत वृत्तसंस्था /मुंबई भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात गुरुवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांत घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींच्या दरम्यान मिळताजुळता कल राहिला होता. परंतु आयटी क्षेत्रात तेजी तर बँकिंग समभागात मोठी घसरण राहिल्याचा परिणाम हा बाजारात झाला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स […]

सलग चौथ्या सत्रात घसरण कायम

सेन्सेक्स 455 तर निफ्टी 152 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात गुरुवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांत घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींच्या दरम्यान मिळताजुळता कल राहिला होता. परंतु आयटी क्षेत्रात तेजी तर बँकिंग समभागात मोठी घसरण राहिल्याचा परिणाम हा बाजारात झाला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 454.69 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.62 टक्क्यांसोबत 72,488.99 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 152.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 21.995.85 वर बंद झाला. मागील आठवड्यातील शुक्रवारच्या सत्रात सुरु झालेला घसरणीचा प्रवास हा नवीन आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशीही कायम राहिला  आहे. बुधवारी रामनवमी राहिल्याने बाजाराला सुट्टी होती.
एचडीएफसी लाईफने मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील नफा कमाईची आकडेवारी सादर केली आहे. कर परतावा केल्यानंतर वर्षाच्या आधारे झालेला नफा हा 14 टक्क्यांनी वधारुन 412 कोटी रुपयावर पोहोचला आहे. गुरुवार शेअर बाजारात तेजी राहिली होती. मात्र अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. वधारलेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, हिंडाल्को, एलअॅण्डटी माइंडट्री, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि इन्फोसिस यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे. अन्य कंपन्यांमध्ये अपोलो हॉस्पिटल, टायटन, ओएनजीसी, नेस्ले इंडिया, अदानी एंटरप्राईजेस, कोल इंडिया आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग हे प्रभावीत राहिले.
52 आठवड्यातील अव्वल समभाग
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी चढउताराचा कल राहिला होता. तर मागील 52 आठवड्यांच्या प्रवासात जस्ट डायल, एबीबी पॉवर, 360 वन वॅम, क्वेस कॉर्प, मॅनकाइंड फार्मा, जिओ फायनान्स आणि केएसईबी यांचे समभाग अव्वल राहिले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या

भारती एअरटेल 1267
पॉवरग्रिड कॉर्प  280
इन्फोसिस          1420
लार्सन अॅड टुब्रो 3555
बजाज ऑटो      9062
हिंडाल्को           616
सिमेन्स               5584
हॅवेल्स इंडिया    1494
मॅरिको               508
डाबर इंडिया     504

 समभाग घसरलेल्या कंपन्या

नेस्ले    2462
टायटन        3526
अॅक्सिस बँक     1024
एनटीपीसी         351
टाटा मोर्ट्स        371
आयटीसी           418
टेक महिंद्रा        1179
बजाज फिनसर्व्ह      1597
आयसीआयसीआय    1055
एचडीएफसी बँक         1494
विप्रो    444
स्टेट बँक            744
अल्ट्राटेक सिमेंट              9387
सनफार्मा           1523
बजाज फायनान्स             6889
मारुती सुझुकी   12403
एशियन पेन्ट्स   2811
इंडसइंड बँक    1481
कोटक महिंद्रा   1786
एचसीएल टेक   1470
हिंदुस्थान युनि   2214
टीसीएस             3863
रिलायन्स इंडस्ट्रीज    2928
जेएसडब्लू स्टील         844
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा  2029
टाटा स्टील         160
अशोक लेलँड    169
मॅक्सहेल्थकेअर 789
कोल इंडिया      438
सिप्ला  1352
डिव्हीस लॅब       3717