आमगाववासियांचा स्थलांतराचा निर्णय
येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार : ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या व्यथा
खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात अतिशय दुर्गंम आणि सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या आमगाव ग्रामस्थांनी रविवारी गावात बैठक घेऊन स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना सांगितले. भारत लाईव्ह न्यूज मीडियाच्या प्रतिनिधीनी आमगाव येथे भेट देवून आमगाववासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. गेल्या चार दिवसापूर्वी आमगाव येथील एका महिलेला उपचारासाठी तिरडीवरुन आणण्यात आले होते. याबाबतचे वृत्त ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’मधून प्रसिद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या समस्यांबाबत वाच्या फोडण्यात आली होती. यामुळे आमगाववासियांच्या समस्या सर्वदूर पोहचल्या होत्या. आमगाव हे गाव तालुक्यातील अतिशय दुर्गंम भागात असून या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. तसेच हे गाव सर्वसामान्य सुविधेपासून पूर्णपणे वंचित आहे. वनखात्याच्या आडमुठे धोरणामुळे या गावाला कोणत्याही शासकीय योजना पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे हे गाव गेल्या 75 वर्षापासून सर्व सुविधांपासून दूरच राहिले आहे.
ग्रामस्थ अनेक समस्यांना तोंड देत निसर्गाशी जुळवून आपले जीवन जगत आहेत. या गावाला शेतीही नसल्याने ग्रामस्थ उपजीविकेसाठी गोवा व अन्य ठिकाणी कामधंद्यानिमित्त जातात. गावात काही वृद्ध मंडळी आणि स्त्रिया आहेत. कोणताही प्रसंग आल्यास गावकरी हतबल होऊन राहण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. नुकताच हर्षदा घाडी यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तिरडीवरुन चार कि. मी. वाहून आणून उपचारासाठी बेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा आमगाव गावच्या समस्या चर्चेत आली आहे. त्यामुळे ग्रामस्थही आता समाजजीवनात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी रविवार दि. 21 रोजी ग्रामस्थांनी बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने आम्हाला नव्याने गाव बसवण्यासाठी जागा देण्यात यावी, तसेच उपजीविकेसाठी शेती आणि नुकसानभरपाई देवून आम्हाला तातडीने स्थलांतरित करण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याबाबत भारत लाईव्ह न्यूज मीडिया प्रतिनिधीने आमगाव येथे प्रत्यक्ष भेट देवून गावकऱ्यांशी संवाद साधला असता, आपण स्थलांतरित होऊन सामाजिक प्रवाहात येण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमगाव येथील सुरेश देवळी, निलेश घाडी, दत्ता गावडे, शांताराम गावडे, संतोष घाडी, रुपेश बळगी, सुधाकर घाडी, नागेश गावडे, लक्ष्मण गवस, श्रीकांत बडगी, मनोहर घाडी, यशवत घाडी, बोमाण्णा गावस, पांडुरंग भट, विठोबा नाईकसह अन्य ग्रामस्थांनी भारत लाईव्ह न्यूज मीडियाशी बोलताना स्थलांतरित होण्यासाठी गावकऱ्यांचा निर्णय झाल्याचे सांगितले. दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्हाला स्थलांतरित करावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
Home महत्वाची बातमी आमगाववासियांचा स्थलांतराचा निर्णय
आमगाववासियांचा स्थलांतराचा निर्णय
येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार : ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या व्यथा खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात अतिशय दुर्गंम आणि सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या आमगाव ग्रामस्थांनी रविवारी गावात बैठक घेऊन स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तरुण भारतच्या प्रतिनिधीनी आमगाव येथे भेट देवून आमगाववासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. गेल्या चार दिवसापूर्वी आमगाव येथील एका महिलेला उपचारासाठी […]