आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

मराठी मालिका आई कुठे काय करते फेम कांचन आजी अर्चना पाटकरची सून हेमलता पाटकर हिला गोरेगाव मधील नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी …

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

मराठी मालिका आई कुठे काय करते फेम कांचन आजी अर्चना पाटकरची सून हेमलता पाटकर हिला गोरेगाव मधील नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. 

मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांना खंडणीचा पहिला हफ्ता घेताना रंगेहात अटक केली आहे. 

ALSO READ: ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’- रिंकू राजगुरूची ‘आशा’ १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यातील अंधेरी पश्चिमच्या एका हॉटेलचे आहे.एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाईट्सच्या वापरावरून हेमलता आणि अमरिना यांचा व्यावसायिकाच्या मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि हाणामारी पर्यंत पोहोचला.

नंतर या दोघानीही 23 नोव्हेंबर रोजी बिल्डरच्या मुलाच्या विरोधात विनयभंग केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले की ही तक्रार खंडणीसाठी दाखल केली आहे. व्यावसायिकाला महिलांनी तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी केली. सततच्या दबाब आणि खंडणीच्या मागणीला कंटाळून  बिल्डरच्या मुलाने गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. 

ALSO READ: अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅन्सवर रागावली
पोलिसांनी या प्रकरणातील संपूर्ण संवादाचे पुरावे गोळा केले आणि सापळा रचून दोघी महिलांना खंडणीचा पहिला हफ्ता घेताना आरोपी महिलांना रंगेहात पकडले. हेमलता पाटकर आणि अमरिना यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 452 , कलम 323 , कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

ALSO READ: अभिनेत्री गिरिजा ओकने एआय-मॉर्फ केलेल्या अश्लील प्रतिमांबद्दल चिंता व्यक्त केली

आरोपी महिलांना पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी सुनावली.कोठडीची मुदत संपल्यावर शनिवारी त्यांना एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले तिथे न्यायालयाने दोघींना 29 डिसेंबर पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. 

  

Edited By – Priya Dixit