ठाण्यातील नवे सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

ठाणे (thane) आयुक्तालय परिसरातील सायबर गुन्ह्यांचा (cyber crimes) तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे नवे सायबर पोलीस ठाणे (police station) अखेर कार्यान्वित झाले आहे. नवीन पोलीस ठाण्यामुळे सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपासाला गती येण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यात सहा अधिकारी आणि 30 कर्मचारी असतील. ठाणे पोलीस (thane police) आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे प्रमाणही वाढले आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली मोबाईलवर लिंक पाठवून बँक खाती रिकामी करणे, आर्थिक फसवणूक करणे असे सायबर गुन्हे ठाणे शहरात दररोज घडत आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे नव्हते. त्यामुळे पोलिस सायबर गुन्हे अन्वेषण कक्षामार्फत तपास करत होते. काही महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तालय मुख्यालयाजवळ सायबर पोलिस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले. मंगळवारी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले. या पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहा अधिकारी व 30 पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.हेही वाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने 23 वर्षीय तरुणीची हत्या मुंबई : MMRDA कडून ‘मेट्रो 1’चे संपादन रद्द

ठाण्यातील नवे सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

ठाणे (thane) आयुक्तालय परिसरातील सायबर गुन्ह्यांचा (cyber crimes) तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे नवे सायबर पोलीस ठाणे (police station) अखेर कार्यान्वित झाले आहे. नवीन पोलीस ठाण्यामुळे सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपासाला गती येण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यात सहा अधिकारी आणि 30 कर्मचारी असतील. ठाणे पोलीस (thane police) आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे प्रमाणही वाढले आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली मोबाईलवर लिंक पाठवून बँक खाती रिकामी करणे, आर्थिक फसवणूक करणे असे सायबर गुन्हे ठाणे शहरात दररोज घडत आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे नव्हते. त्यामुळे पोलिस सायबर गुन्हे अन्वेषण कक्षामार्फत तपास करत होते. काही महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तालय मुख्यालयाजवळ सायबर पोलिस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले. मंगळवारी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले. या पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहा अधिकारी व 30 पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.हेही वाचालग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने 23 वर्षीय तरुणीची हत्यामुंबई : MMRDA कडून ‘मेट्रो 1’चे संपादन रद्द

Go to Source