लवकरच रविंद्र नाट्य मंदीरचा पडदा उघडणार

पडद्याआड अथवा पडद्यासमोरील नाट्यकलाकार, रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या मध्य मुंबईतील (mumbai) प्रभादेवी (prabhadevi) येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या वास्तूचे शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) व अजित पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे.पु .ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र (maharashtra) कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमींच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच उपजत कला गुण असलेल्या कलाकारांसाठीही विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दोन दशकांपूर्वी बांधलेली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाची वास्तू ऑक्टोबर 2023 मध्ये नूतनीकरणासाठी बंद करण्यात आली. मात्र लांबलेला पाऊस आणि कामातील छोट्या – मोठ्या बारकाव्यांमुळे नाट्यगृह सुरू करण्याचे काम लांबणीवर गेले. अखेर आता या संकुलाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यामुळे कलाकार तसेच रसिकप्रेक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आता रविंद्र नाट्य मंदीर (ravindra natya mandir) ही महत्त्वाची वास्तू ठरणार आहे.हेही वाचा नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार बेकरीतील भट्ट्या रुपांतरीत करणे अशक्य

लवकरच रविंद्र नाट्य मंदीरचा पडदा उघडणार

पडद्याआड अथवा पडद्यासमोरील नाट्यकलाकार, रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या मध्य मुंबईतील (mumbai) प्रभादेवी (prabhadevi) येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या वास्तूचे शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) व अजित पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे.पु .ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.पु.ल.देशपांडे महाराष्ट्र (maharashtra) कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमींच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच उपजत कला गुण असलेल्या कलाकारांसाठीही विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.दोन दशकांपूर्वी बांधलेली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाची वास्तू ऑक्टोबर 2023 मध्ये नूतनीकरणासाठी बंद करण्यात आली. मात्र लांबलेला पाऊस आणि कामातील छोट्या – मोठ्या बारकाव्यांमुळे नाट्यगृह सुरू करण्याचे काम लांबणीवर गेले. अखेर आता या संकुलाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यामुळे कलाकार तसेच रसिकप्रेक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आता रविंद्र नाट्य मंदीर (ravindra natya mandir) ही महत्त्वाची वास्तू ठरणार आहे.हेही वाचानवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ उभारण्यात येणारबेकरीतील भट्ट्या रुपांतरीत करणे अशक्य

Go to Source