बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केला मोठा खुलासा!
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने आत्ता पर्यंत 4 आरोपींना अटक केली असून तिघे फरार आहे. पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी आणखी 7.62 मिमी पिस्तूल जप्त केले आहे. आरोपी नेमबाज गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी कुर्ला भागातील त्यांच्या भाड्याच्या घरात यूट्यूबवर व्हिडिओ पाहून गोळीबार शिकला आणि मुंबईत सराव केला.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले असून तीन महिन्यांपूर्वी हत्येचा कट रचण्यात आला. आरोपी अनेकदा शस्त्रांशिवाय त्यांचा घरी गेले. तसेच आरोपींनी घराच्या आणि कार्यालयात जाऊन पाहणी केली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे.
काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी (66) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री मुंबईतील निर्मल नगर भागात आमदार मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तिघांनी त्यांना अडवले आणि गोळ्या झाडून पळ काढला. मात्र काही वेळातच गुरमेल आणि धरमराज या दोन शूटर्सना पोलिसांनी पकडले.
Edited By – Priya Dixit