अधिवेशन संपले, पेव्हर्स निखळले!

तिसऱ्या रेल्वेगेटवरील उड्डाणपुलावर पुन्हा ख•dयांचे साम्राज्य बेळगाव : हिवाळी अधिवेशनावेळी मंत्री तसेच आमदार बेळगावमध्ये येणार असल्याने तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावर पंधरा दिवसांपूर्वी पेव्हर्स बसविण्यात आले होते. बसविलेले पेव्हर्स अधिवेशन संपताच निखळले आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा किती उच्च होता? हे आता समोर येत आहे. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलानजीक उद्यमबागच्या बाजूने असणाऱ्या उतारावरील रस्ता खराब झाला […]

अधिवेशन संपले, पेव्हर्स निखळले!

तिसऱ्या रेल्वेगेटवरील उड्डाणपुलावर पुन्हा ख•dयांचे साम्राज्य
बेळगाव : हिवाळी अधिवेशनावेळी मंत्री तसेच आमदार बेळगावमध्ये येणार असल्याने तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावर पंधरा दिवसांपूर्वी पेव्हर्स बसविण्यात आले होते. बसविलेले पेव्हर्स अधिवेशन संपताच निखळले आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा किती उच्च होता? हे आता समोर येत आहे. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलानजीक उद्यमबागच्या बाजूने असणाऱ्या उतारावरील रस्ता खराब झाला होता. या ठिकाणी खड्डे पडले असल्याने 3 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पेव्हर्स बसविण्यात आले. परंतु, पेव्हर्स बसविताना अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य वापरल्याने अवघ्या दोन आठवड्यांमध्येच पेव्हर्स निखळून इतरत्र पडले आहेत. यामुळे उड्डाणपुलावरून उद्यमबागच्या दिशेने जाताना दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
तात्पुरती मलमपट्टी करून डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार
पेव्हर्स पूर्णपणे निखळले असून अवजड वाहनांमुळे इतरत्र फेकले जात आहेत. उड्डाणपुलावरून भरधाव येणारी वाहने पेव्हर्सवरून गतीने पुढे निघत असल्याने अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. केवळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती मलमपट्टी करून डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार असल्याचे उद्योजकांमधून बोलले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पेव्हर्स निखळल्याचे वृत्त दिवसभर चर्चेत राहिले होते. याची दखल घेऊन रविवारी रात्री उशिरा या ठिकाणी पुन्हा पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. परंतु ते तरी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच.

Go to Source