गोवावेस येथील त्या पेट्रोल पंपाचे साहित्य हटविले
बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोल पंप चालकाने भू-भाडे दिले नाही त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने तेथील साहित्य हटविण्याची परवानगी महानगपालिकेला दिली. त्यामुळे या पेट्रोल पंपाचे साहित्य हटविण्यास गुरूवारी सुरूवात करण्यात आली आहे. जवळपास संपूर्ण साहित्य हटविण्यात आले असून पेट्रोलची टँकही काढण्यात आली असून आता नव्याने निविदा घेतलेल्या व्यक्तीला ही जागा दिली जाणार आहे.
गोवावेस येथील पेट्रोल पंपच्या जागेचे भाडे थकले होते. सव्वाकोटीहून अधिक रूपये भाडे थकल्यानंतर संबंधीत मालकाला जागा खाली करण्याबाबत आदेश देण्यात आला होता. मात्र बीपीसीएल कंपनीनेच महानगरपालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला. मात्र त्या ठिकाणी महानगपालिकेच्या वकीलांनी न्यायालयासमोर महानगरपालिकेची बाजू भक्क्मपणे मांडली. न्यायालयाने ही जागा खुली करण्यासाठी वेळ दिला. त्यावेळेत आता महानगरपालिका तेथील साहित्य काढुन संबंधीतांना देत आहे.
गोवावेस येथील या जागेतील साहित्य काढुन घेण्यात आले आहे. मात्र आता महानगरपालिकेचे थकीत असलेले भू-भाडे संबंधीत मालकांकडून कसे वसुल करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सर्वसाधारण बैठकीमध्येही जोरादार चर्चा झाली होती. या पेट्रोलपंपाचा खटला न्यायालयात असल्यामुळे त्याबाबत चर्चा करू नये असे कायदा सल्लागारांनी सांगितले होते. मात्र आता न्यायालयानेच हा प्रश्न निकालात काढला आहे. त्यामुळे नव्याने टेंडर घेतलेल्या व्यक्तीला ही जागा लवकरच दिली जाणार आहे.
Home महत्वाची बातमी गोवावेस येथील त्या पेट्रोल पंपाचे साहित्य हटविले
गोवावेस येथील त्या पेट्रोल पंपाचे साहित्य हटविले
बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोल पंप चालकाने भू-भाडे दिले नाही त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने तेथील साहित्य हटविण्याची परवानगी महानगपालिकेला दिली. त्यामुळे या पेट्रोल पंपाचे साहित्य हटविण्यास गुरूवारी सुरूवात करण्यात आली आहे. जवळपास संपूर्ण साहित्य हटविण्यात आले असून पेट्रोलची टँकही काढण्यात आली असून आता नव्याने निविदा घेतलेल्या व्यक्तीला ही जागा दिली जाणार आहे. […]