थकीत वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडणार

हेस्कॉमचा थकबाकीदारांना इशारा : 30 जूनपर्यंत बिल भरण्याच्या सूचना बेळगाव : गृहज्योती योजनेतून ग्राहकांना 200 युनिटपयर्तिं सरासरीनुसार मोफत वीजपुरवठा दिला जातो. परंतु, सरासरीपेक्षा अधिक वापर होणाऱ्या ग्राहकांना महिन्याला विद्युतबिल दिले जाते. बिल येऊन देखील ते भरले जात नसल्याने हेस्कॉमची थकबाकी वाढली आहे. ही थकबाकी जूनअखेरपयर्तिं न भरल्यास त्या ग्राहकांचे वीजकनेक्शन बंद करण्याचे हेस्कॉमने ठरविले आहे. हेस्कॉमची थकबाकी वाढत असल्याने हुबळी येथील […]

थकीत वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडणार

हेस्कॉमचा थकबाकीदारांना इशारा : 30 जूनपर्यंत बिल भरण्याच्या सूचना
बेळगाव : गृहज्योती योजनेतून ग्राहकांना 200 युनिटपयर्तिं सरासरीनुसार मोफत वीजपुरवठा दिला जातो. परंतु, सरासरीपेक्षा अधिक वापर होणाऱ्या ग्राहकांना महिन्याला विद्युतबिल दिले जाते. बिल येऊन देखील ते भरले जात नसल्याने हेस्कॉमची थकबाकी वाढली आहे. ही थकबाकी जूनअखेरपयर्तिं न भरल्यास त्या ग्राहकांचे वीजकनेक्शन बंद करण्याचे हेस्कॉमने ठरविले आहे. हेस्कॉमची थकबाकी वाढत असल्याने हुबळी येथील मुख्य कार्यालयाकडून बेळगाव कार्यालयाला वारंवार विचारणा होत आहे. यासंदर्भात बुधवारी नेहरुनगर येथील विभागीय कार्यालयात शहर विभागाची बैठक झाली. शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी घेतलेल्या बैठकीत थकबाकीविषयी चर्चा करण्यात आली. जे ग्राहक महिनाअखेरपयर्तिं थकीत विद्युतबिल भरणार नाहीत, त्यांचे वीजकनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तशा सूचना हुबळी येथील कार्यालयाने हेस्कॉम अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
गृहज्योती योजना सुरू होण्यापूर्वीपासूनची विद्युतबिले अद्याप थकीत आहेत. तसेच गृहज्योती योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित विद्युतबिल भरण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. जे ग्राहक उर्वरित विद्युतबिल वेळच्यावेळी भरत नाहीत, त्यांना पुढील महिन्यात गृहज्योतीचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे संबंधित ग्राहकाला त्या महिन्याचे पूर्ण बिल भरावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी थकीत विद्युतबिल 30 जूनपूर्वी भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी हेस्कॉमच्या एटीपी केंद्रांवर व ऑनलाईन विद्युतबिल भरावे. 30 जूननंतर बिल थकीत राहिल्यास कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. त्या ग्राहकांचे वीजकनेक्शन तोडले जाणार असल्याचा इशारा हेस्कॉमने दिला आहे. या बैठकीला साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मण्णावर, संजीव सुखसारे, अश्विन शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.