दीपा कर्माकरचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर भारताची ऑलिम्पिक महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचे तब्बल आठ वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन होत आहे. येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक चॅम्पियनशिप स्पर्धेत दीपा सहभागी होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत प्रणाती नायक तसेच राष्ट्रीय जिम्नॅस्ट योगेश्वरसिंग, राकेश पात्रा, तपन मोहांती, सैफ तांबोळी, गौरव कुमार यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष […]

दीपा कर्माकरचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारताची ऑलिम्पिक महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचे तब्बल आठ वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन होत आहे. येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक चॅम्पियनशिप स्पर्धेत दीपा सहभागी होत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत प्रणाती नायक तसेच राष्ट्रीय जिम्नॅस्ट योगेश्वरसिंग, राकेश पात्रा, तपन मोहांती, सैफ तांबोळी, गौरव कुमार यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहिल. सदर स्पर्धा येथील कलिंगा स्टेडियमवर खेळविली जात आहे. यापूर्वी ओडिशाने कनिष्ठांची आर्टिस्टिक जिम्नॅस्टीक राष्ट्रीय स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी केली होती. दीपा कर्माकर तब्बल आठ वर्षानंतर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असल्याचे तिचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी सांगितले आहे.