महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र
बेळगाव : कर्नाटक सरकारने व्यवसाय करणाऱ्या दुकानांवरील फलकांवर 60 टक्के कन्नड लिहिणे सक्तीचे केले आहे. याबाबत बेळगाव महानगरपालिका आपल्या अधिकाऱ्यांना आस्थापनांकडे पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबित आहे. बेळगावमधील बहुतेक भागात फलक मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत. परंतु बेळगाववर कन्नडचे प्राबल्य दाखविण्याकरिता कर्नाटक सरकारने काही कन्नड संघटनांना हाताशी धरून मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकेच्या या दडपशाहीविऊद्ध आणि दादागिरीविऊद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीमा समन्वयक मंत्री शंभुराजे देसाई यांना पत्र पाठवून मराठी माणसाविऊद्ध चाललेल्या या कृत्यासंदर्भात माहिती दिली आहे. नुकतेच एकनाथ शिंदे आणि शंभुराजे देसाई यांच्याबरोबर समितीच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली आहे. त्यावेळी लवकरात लवकर आपण कर्नाटक सरकारशी संपर्क करीत आहोत, असे उत्तर देण्यात आले होते. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आपल्या मंत्री गटाच्या बैठकीत नागरिकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे आदेश दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून सरकार दडपशाही करत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सीमावासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशा प्रकारची विनंती समितीने पत्राद्वारे केली आहे. या पत्रावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या सह्या आहेत.
Home महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र बेळगाव : कर्नाटक सरकारने व्यवसाय करणाऱ्या दुकानांवरील फलकांवर 60 टक्के कन्नड लिहिणे सक्तीचे केले आहे. याबाबत बेळगाव महानगरपालिका आपल्या अधिकाऱ्यांना आस्थापनांकडे पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबित आहे. बेळगावमधील बहुतेक भागात फलक मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत. परंतु बेळगाववर कन्नडचे प्राबल्य दाखविण्याकरिता कर्नाटक सरकारने काही कन्नड संघटनांना हाताशी धरून मराठी माणसांना […]