आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

राज्यातील पूरस्थितीची दिली माहिती वृत्तसंस्था/ गुवाहाटी आसाममध्ये पूरस्थितीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. राज्याच्या 11 जिल्ह्यांमधील पूरग्रस्त लोकांची संख्या आता कमी होत 95 हजारावर आली आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत राज्यातील पूरस्थितीची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळविण्याची आज संधी मिळाली. बैठकीदरम्यान त्यांना आसाममधील पूरस्थितीविषयी […]

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

राज्यातील पूरस्थितीची दिली माहिती
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये पूरस्थितीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. राज्याच्या 11 जिल्ह्यांमधील पूरग्रस्त लोकांची संख्या आता कमी होत 95 हजारावर आली आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत राज्यातील पूरस्थितीची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळविण्याची आज संधी मिळाली. बैठकीदरम्यान त्यांना आसाममधील पूरस्थितीविषयी माहिती दिली. तसेच राज्यातील लोकांसमोरील आव्हाने कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांविषयी त्यांना माहिती दिली. तसेच विकासकामांच्या स्थितीबद्दल त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे हेमंत शर्मा यांनी म्हटले आहे.
आसाममध्ये यंदा पूरामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 113 झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार राज्यातील 345 गावांना पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रभावित जिल्ह्यांमध्ये मोरीगाव, कामरुप, धेमाजी, डिब्रूगढ, शिवसागर, नागांव, गोलाघाट, गोलपारा, जोरहाट आणि कछार सामील आहे. पूरामुळे नागांव जिल्हा सर्वाधिक प्रभावित राहिला. पूरामुळे हजारो हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले आहे. तर 6311 लोकांना मदतशिबिरांमध्ये रहावे लागले आहे. धुबरीमध्ये ब्रह्मपुत्रा नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तर अन्य प्रभावित जिल्ह्dयांमधील नदीची पातळी कमी होऊ लागली आहे.