मंत्रिमंडळासह मुख्यमंत्र्यांचे आज अयोध्येकडे प्रयाण

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या मंत्रिमंडळासह सत्ताधारी पक्षातील बहुतेक आमदारांसह आज बुधवारी येथून अयोध्येकडे प्रयाण करीत आहेत. गुऊवार दि. 15 रोजी सकाळी अकरा वाजता गोव्यातून गेलेले सर्वजण कार्यकर्त्यांसह अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.  गोव्यातून सोमवारी 1337 कार्यकर्त्यांना घेऊन खास रेल्वेगाडी अयोध्येला रवाना झाली आहे. हे सर्व कार्यकर्ते उद्या अयोध्येत पोहोचणार […]

मंत्रिमंडळासह मुख्यमंत्र्यांचे आज अयोध्येकडे प्रयाण

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या मंत्रिमंडळासह सत्ताधारी पक्षातील बहुतेक आमदारांसह आज बुधवारी येथून अयोध्येकडे प्रयाण करीत आहेत. गुऊवार दि. 15 रोजी सकाळी अकरा वाजता गोव्यातून गेलेले सर्वजण कार्यकर्त्यांसह अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.  गोव्यातून सोमवारी 1337 कार्यकर्त्यांना घेऊन खास रेल्वेगाडी अयोध्येला रवाना झाली आहे. हे सर्व कार्यकर्ते उद्या अयोध्येत पोहोचणार आहेत. त्यानंतर ते अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील. यावेळी मुख्यमंत्री सपत्निक उपस्थित राहणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिगंबर कामत वगळता अन्य आमदार व मंत्री, सभापती, उपसभापती सर्वजण रामलल्लाच्या दर्शनाला जात आहेत.