न्यायालय आवारासमोरील चेंबर केला खुला

बेळगाव : कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ सर्कल रोडवरील जेएमएफसी न्यायालयाच्या शेजारी असलेले ड्रेनेज चेंबर ब्लॉक झाल्याने पुन्हा समस्या निर्माण झाली. पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे शनिवारी सकाळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकिंग मशीनद्वारे ते ड्रेनेज चेंबर खुले करण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार चेंबर ब्लॉक झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. बराच उशीर प्रयत्न करून ते चेंबर खुले […]

न्यायालय आवारासमोरील चेंबर केला खुला

बेळगाव : कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ सर्कल रोडवरील जेएमएफसी न्यायालयाच्या शेजारी असलेले ड्रेनेज चेंबर ब्लॉक झाल्याने पुन्हा समस्या निर्माण झाली. पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे शनिवारी सकाळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकिंग मशीनद्वारे ते ड्रेनेज चेंबर खुले करण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार चेंबर ब्लॉक झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. बराच उशीर प्रयत्न करून ते चेंबर खुले करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून चेंबरमधून पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर दुरुस्त करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा तो चेंबर ब्लॉक झाला. शनिवारी कर्मचाऱ्यांनी बराच उशीर लागून ते चेंबर खुले केले आहेत.