कांदा मार्केटमधील सीडीवर्क उखडल्याने धोकादायक स्थिती

अनेकजणांना दुखापत : दुरुस्ती न केल्यास आंदोलन बेळगाव : नेहमीच वर्दळ असलेल्या कांदा मार्केट येथील सीडी वर्कचे काम मागील अनेक वषर्पांसून ठप्प आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी कचरा अडकून गटारीतील पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठेत अशी अवस्था झाली असल्याने व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून सीडी वर्कचे काम लवकर पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. […]

कांदा मार्केटमधील सीडीवर्क उखडल्याने धोकादायक स्थिती

अनेकजणांना दुखापत : दुरुस्ती न केल्यास आंदोलन
बेळगाव : नेहमीच वर्दळ असलेल्या कांदा मार्केट येथील सीडी वर्कचे काम मागील अनेक वषर्पांसून ठप्प आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी कचरा अडकून गटारीतील पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठेत अशी अवस्था झाली असल्याने व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून सीडी वर्कचे काम लवकर पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कांदा मार्केट येथे दररोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. खरेदीसाठी केवळ बेळगावच नाही तर आजूबाजूच्या भागातूनही नागरिक येत असतात. कांदा मार्केट येथे असणारे सीडी वर्क निकामी झाले आहे.सीडी वर्कचा काँक्रिटचा भाग कोसळला असल्याने एका बाजूला भगदाड पडले आहे. वर्दळीचे ठिकाण असल्याने या खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक जण यामध्ये पडले आहेत. रात्रीच्या वेळी काळोखात खड्डा दिसून न आल्याने दुचाकीचालकांनाही अपघात झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवून देखील सीडी वर्कच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. एकीकडे शहराचा आधुनिक चेहरा दाखवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात काय स्थिती आहे, हे पाहणे गरजेचे आहे. मनपानेही अशा ठिकाणची पाहणी करून या सीडी वर्कचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.