अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक
खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावर इदलहोंडजवळील सर्व्हिस रस्त्यावर झालेल्या बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघातात करविनकोप ता. बेळगाव येथील रहिवासी लक्ष्मण बसाप्पा पुजारी (वय 36) हा जागीच ठार झाला आहे. लक्ष्मण पुजारी हा आपल्या गावी करविनकोप येथे मुलांना भेटण्यासाठी निघाला होता. दुचाकी क्रमांक केए 22 ईजे 6856 वरून निट्टूर येथील महामार्गाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी केए 22-एफ-2125 ही बस बेळगावहून खानापूरकडे जात होती. लक्ष्मण पुजारी याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बसला जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली असून खानापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी इस्पितळात हलविण्यात आला. लक्ष्मण पुजारी याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Home महत्वाची बातमी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावर इदलहोंडजवळील सर्व्हिस रस्त्यावर झालेल्या बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघातात करविनकोप ता. बेळगाव येथील रहिवासी लक्ष्मण बसाप्पा पुजारी (वय 36) हा जागीच ठार झाला आहे. लक्ष्मण पुजारी हा आपल्या गावी करविनकोप येथे मुलांना भेटण्यासाठी निघाला होता. दुचाकी क्रमांक […]