बार असोसिएशनचा बिगुल वाजला

9 फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे केले निश्चित : सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीचा बिगुल वाजला असून 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली […]

बार असोसिएशनचा बिगुल वाजला

9 फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे केले निश्चित : सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीचा बिगुल वाजला असून 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण होते. विद्यमान बेळगाव बार असोसिएशन कमिटीची मुदत संपली होती. त्यानंतर आता सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले. दोन वर्षांतून एकदा ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्या नियमानुसार आता ही निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले. 9 फेब्रुवारीला मतदान तसेच त्या दिवशी मतमोजणीही घेण्यात येणार आहे.
बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. यावर्षी अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणूक कधी होणार, याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागून होते. सोमवारी जुन्या लायब्ररी सभागृहामध्ये सभा घेण्यात आली. बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील यांनी सभेचा उद्देश स्पष्ट करून मागील हिशोबाची माहिती दिली. यावेळी अॅड. अनिल सांबरेकर यांच्यासह इतर वकिलांनी विचार व्यक्त केले. अध्यक्ष एक, उपाध्यक्ष दोन, जनरल सेक्रेटरी एक, जॉईंट सेक्रेटरी एक, महिला प्रतिनिधी आणि पाच कमिटी सदस्य असे एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यावेळी उपाध्यक्ष सचिन शिवन्नावर, जॉईंट सेक्रेटरी अॅड. बंटी कपाई, सदस्य अॅड. पी. के. पवार, अॅड. महांतेश पाटील, अॅड. इरफान बयाळ यासह इतर सदस्य उपस्थित होते.