ऐतिहासिक दसरा चौकात शाहूंच्या विचारांचा जागर! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

ऐतिहासिक दसरा चौकात शाहूंच्या विचारांचा जागर! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

 विविध संस्था, संघटनांच्यावतीने अभिवादनासाठी गर्दी : पोलीस बँड पथकाची मानवंदना

कोल्हापूर प्रतिनिधी

सामाजिक समतेचा संदेश देणारे, समाजाला दिशादर्शक निर्णय घेणारे, करवीर संस्थानचा विकास, सर्वसामान्यांचा उद्धार, मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, कला, क्रीडा सांसकृतिक, साहित्यिक, उद्योग अशा सर्व क्षेत्रात आभाळाएवढे काम करणारे रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त बुधवारी ऐतिहासिक दसरा चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासुन गर्दी झाली होती.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सकाळी दसरा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवाद करण्यात आले. यानंतर सकाळी पोलिस बँडद्वारे मानवंदना देण्यात आली. रिमझीम पावसाच्या सरीतही विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिवादनासाठी दिवसभर गर्दी केली होती.