म्हाडाच्या घरांचे अर्ज करण्याची मुदत 12 तासांनी वाढवली

म्हाडाच्या (mhada) मुंबई (mumbai) मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत गुरूवारी दुपारी 12 वाजता संपणार होती. ही मुदत संपण्यास काही मिनिटांचा कालावधी (deadline) शिल्लक असताना मुंबई मंडळाने अर्ज भरण्याच्या मुदतीत 12 तासांची वाढ केली. यामुळे इच्छुक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.  आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध असूनही काही कारणांमुळे जे गुरूवारी 12 वाजेपर्यंत अर्ज करु शकले नाहीत, ते आता रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरु शकणार आहेत. अर्ज भरून ठराविक रकमेसह गुरूवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 9 ऑगस्टपासून अर्जविक्री (application) प्रक्रियेस सुरुवात झाली होती. 4 सप्टेंबरला अर्जविक्री प्रक्रिया संपणार होती. मात्र महागडी घरे आणि इतर अनेक कारणांमुळे अर्जविक्रीस मुदतवाढ देण्यात आली होती.  त्यानुसार, गुरूवारी दुपारी 11.59 वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार होती. तर ठराविक रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत रात्री 11.59 वाजता संपणार आहे. असे असताना अर्ज भरण्याची दुपारी 11.59 वाजेपर्यंतची मुदत संपण्यापूर्वी मुंबई मंडळाने अर्ज भरण्याच्या मुदतीत 12 तासांची वाढ केली.  त्यानुसार आता गुरुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर याच कालावधीपर्यंत अर्ज भरणाऱ्यांनी अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करणे आवश्यक असणार आहे. आज रात्री 11.59 वाजल्यानंतर अर्जविक्रीची प्रक्रिया बंद होणार आहे. दरम्यान अर्जविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 1 लाख 23 हजार अर्ज भरले आहेत. तर त्यातील अंदाजे 97 हजार अर्जदारांनी ठराविक रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. हेही वाचा सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवायच्या आहेत : जितेंद्र आव्हाड डीजे बंदीचा आदेश सर्व मिरवणुकांसाठी लागू

म्हाडाच्या घरांचे अर्ज करण्याची मुदत 12 तासांनी वाढवली

म्हाडाच्या (mhada) मुंबई (mumbai) मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत गुरूवारी दुपारी 12 वाजता संपणार होती. ही मुदत संपण्यास काही मिनिटांचा कालावधी (deadline) शिल्लक असताना मुंबई मंडळाने अर्ज भरण्याच्या मुदतीत 12 तासांची वाढ केली. यामुळे इच्छुक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध असूनही काही कारणांमुळे जे गुरूवारी 12 वाजेपर्यंत अर्ज करु शकले नाहीत, ते आता रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरु शकणार आहेत. अर्ज भरून ठराविक रकमेसह गुरूवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 9 ऑगस्टपासून अर्जविक्री (application) प्रक्रियेस सुरुवात झाली होती. 4 सप्टेंबरला अर्जविक्री प्रक्रिया संपणार होती. मात्र महागडी घरे आणि इतर अनेक कारणांमुळे अर्जविक्रीस मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार, गुरूवारी दुपारी 11.59 वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार होती. तर ठराविक रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत रात्री 11.59 वाजता संपणार आहे. असे असताना अर्ज भरण्याची दुपारी 11.59 वाजेपर्यंतची मुदत संपण्यापूर्वी मुंबई मंडळाने अर्ज भरण्याच्या मुदतीत 12 तासांची वाढ केली. त्यानुसार आता गुरुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर याच कालावधीपर्यंत अर्ज भरणाऱ्यांनी अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करणे आवश्यक असणार आहे. आज रात्री 11.59 वाजल्यानंतर अर्जविक्रीची प्रक्रिया बंद होणार आहे.दरम्यान अर्जविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 1 लाख 23 हजार अर्ज भरले आहेत. तर त्यातील अंदाजे 97 हजार अर्जदारांनी ठराविक रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. हेही वाचासरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवायच्या आहेत : जितेंद्र आव्हाडडीजे बंदीचा आदेश सर्व मिरवणुकांसाठी लागू

Go to Source