राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हालचाली वाढल्या

रिंगरोडमध्ये जाणाऱ्या जमिनींमधील झाडांचा सर्व्हे करण्याची वनविभागाला सूचना बेळगाव : रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांतील जमिनी जाणार आहेत. त्याबाबत नोटिफिकेशन देऊन हरकती दाखल केल्या होत्या. मात्र त्या हरकती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेटाळल्यानंतर काही मोजक्याच शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इतर शेतकऱ्यांच्या जमिनी कब्जात घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. वनविभागाला झाडांचा […]

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हालचाली वाढल्या

रिंगरोडमध्ये जाणाऱ्या जमिनींमधील झाडांचा सर्व्हे करण्याची वनविभागाला सूचना
बेळगाव : रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांतील जमिनी जाणार आहेत. त्याबाबत नोटिफिकेशन देऊन हरकती दाखल केल्या होत्या. मात्र त्या हरकती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेटाळल्यानंतर काही मोजक्याच शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इतर शेतकऱ्यांच्या जमिनी कब्जात घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. वनविभागाला झाडांचा सर्व्हे करण्याची सूचना करण्यात आली असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रिंगरोडमध्ये 1200 एकरहून अधिक सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रारंभी विरोध केला आहे. यासाठी मोर्चाही काढला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जमीन देणार नाही, अशा हरकती दाखल केल्या. मात्र त्या हरकती फेटाळून लावण्यात आल्या. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेणे गरजेचे होते. मात्र झाडशहापूर आणि इतर गावातील बोटावर मोजण्यासारख्या शेतकऱ्यांनीच उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे.
न्यायालयातून ज्या शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविली नाही त्यांची माहिती जमा करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. ती माहिती घेऊन आता विविध भागातील रस्त्यावर असलेल्या झाडांचा सर्व्हे करण्याच्या सूचना वनविभागाला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. रिंगरोडला विरोध करण्यासाठी किमान 50 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी स्थगिती घेणे महत्त्वाचे होते. मात्र शेतकऱ्यांतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हीच संधी साधत हालचाली गतिमान केल्या आहेत. काही गावातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण सुपीक जमिनी जात आहेत. तर झाडशहापूर  गावचा बराच परिसरही या रस्त्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त फटका झाडशहापूर, कडोली, होनगा, उचगाव या गावांना बसणार आहे. बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनाही फटका बसणार आहे. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद या गावातून मिळाला नाही. केवळ झाडशहापूर गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. इतर शेतकऱ्यांनी तातडीने यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता करण्यासाठी हालचाली वाढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Go to Source