प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या एका तुरुंगात एका 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुणाने पोलीस ठाण्याच्या शौचालयात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे 26 जून रोजी आरोपीची प्रेयसी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली असून तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. तिच्या प्रियकराला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने प्रेयसीची हत्या करण्यासाठी ऑनलाईन चाकू खरेदी केला आणि त्याच्याने प्रेयसीवर वार करत हत्या केली. वरोरा पोलीस ठाण्यात आरोपीवर प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आली असून पोलिसांनी त्याला 26 जून पासून 4 जुलै पर्यंत ताब्यात घेतले होते.
तरुण पोलीस ठाण्याचा शौचालयात गेला आणि त्याने बुटाच्या लेस ने शौचालयाच्या दाराला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
हे प्रकरण सीआयडी कडे सोपवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
Edited by – Priya Dixit