बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून
21 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
बारावीची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी अवघे 20 दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी उजळणी करण्याकडे भर देत आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21 हजार 131 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 42 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. प्रतिवर्षांप्रमाणे यावर्षीही प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. उजळणी परीक्षा झाल्यानंतर आता मुख्य परीक्षेच्या तयारीला विद्यार्थी लागले आहेत. मागील वर्षीपेक्षा या वर्षी बारावीचा निकाल वाढावा, यासाठी पदवीपूर्व शिक्षण मंडळाने अनेक उपक्रम राबविले होते. त्यामुळे यावर्षी तरी निकाल वाढणार का? हे पहावे लागणार आहे.
पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून खबरदारी
उजळणी परीक्षेची उत्तरपत्रिका काही ठिकाणी फुटल्याने राज्यभर गोंधळ निर्माण झाला होता. असाच गोंधळ मुख्य परीक्षेत होऊ नये यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. परीक्षेसाठी अवघे 20 दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी उजळणीवर भर देत आहेत. बारावीच्या गुणांवरच पुढील प्रवेश अवलंबून असल्याने अधिकाधिक गुण मिळविण्याची तयारी केली जात आहे.
Home महत्वाची बातमी बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून
बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून
21 हजार विद्यार्थी देणार परीक्षा प्रतिनिधी/ बेळगाव बारावीची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी अवघे 20 दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी उजळणी करण्याकडे भर देत आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21 हजार 131 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील […]
