आदर्शनगर-हिंदवाडी रस्त्यावरील ‘तो’ खड्डा अखेर बुजविला
बेळगाव : आदर्शनगर-हिंदवाडी येथील रस्त्यावरील दुभाजकाला लागूनच मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे लहान-मोठे अपघात या ठिकाणी घडत होते. एलअॅण्डटी कंपनीने खोदाई करून हा खड्डा बुजविलाच नव्हता. त्यामुळे पाच दुचाकीस्वार घसरुन पडले होते. त्यानंतर या खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे खड्डा बुजविण्यात आला असून समाधान व्यक्त होत आहे. आदर्शनगर-हिंदवाडी येथील रस्त्यावर एलअॅण्डटी कंपनीने खोदाई करून पाईप घातली. त्यासाठी हा खड्डा काढण्यात आला होता. या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडले. तो खड्डा बुजवावा, अशी वारंवार मागणी करण्यात आली.अनेक दुचाकीस्वार घसरुन पडल्यानंतर त्यांना जाग आली. अखेर सोमवारी तो खड्डा बुजविण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी आदर्शनगर-हिंदवाडी रस्त्यावरील ‘तो’ खड्डा अखेर बुजविला
आदर्शनगर-हिंदवाडी रस्त्यावरील ‘तो’ खड्डा अखेर बुजविला
बेळगाव : आदर्शनगर-हिंदवाडी येथील रस्त्यावरील दुभाजकाला लागूनच मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे लहान-मोठे अपघात या ठिकाणी घडत होते. एलअॅण्डटी कंपनीने खोदाई करून हा खड्डा बुजविलाच नव्हता. त्यामुळे पाच दुचाकीस्वार घसरुन पडले होते. त्यानंतर या खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे खड्डा बुजविण्यात आला असून समाधान व्यक्त होत आहे. आदर्शनगर-हिंदवाडी येथील रस्त्यावर एलअॅण्डटी कंपनीने […]
