मुंबई पोलिसांशी संबंधित ‌‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे

मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायावर अत्याचार करण्यात आल्याची बातमी काही वृत्तपत्रे, तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला
मुंबई पोलिसांशी संबंधित ‌‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे

मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायावर अत्याचार करण्यात आल्याची बातमी काही वृत्तपत्रे, तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला नसून, त्याचे नाव व सही यांचा कोणी तरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पोलिसावर अत्याचार हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून, काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असल्याचे निदर्शनास आल्याने खोडसाळपणाने अर्ज करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Edited By – Ratnadeep ranshoor 

Go to Source