ओसीआयप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आभार
पणजी : एखाद्या भारतीयाने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी अर्ज केल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होत होते. परिणामी संबंधिताला ‘ओसीआय’ दर्जा मिळविण्यासाठी अडचणी येत होत्या. हा गुंता सोडविण्यासंबंधी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्ट धारकांना पासपोर्ट रद्द झाल्याच्या दाखल्यावर व्हिजा तसेच ओसीआय कार्ड देण्याच्या निर्णयामुळे गोमंतकीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा लोकहितकारक निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
राज्यात अनेक गोमंतकीयांकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द होतो. यामुळे अशा पासपोर्टधारकांना विदेशात जाण्याचा व्हिजाही मिळत नव्हता. तसेच ‘ओसीआय’ कार्डही मिळत नव्हते. हा जटील प्रश्न सोडवण्याची मागणी बराच काळ होत होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेउन हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार लोकसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन होताच केंद्र सरकारने पासपोर्ट रद्द झाल्याच्या दाखल्यावर व्हिजा तसेच ओसीआय कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता व्हिजा वा ओसीआय कार्डसाठी पासपोर्ट प्रत्यार्पण करणे बंधनकारक राहणार नाही. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
Home महत्वाची बातमी ओसीआयप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आभार
ओसीआयप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आभार
पणजी : एखाद्या भारतीयाने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी अर्ज केल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होत होते. परिणामी संबंधिताला ‘ओसीआय’ दर्जा मिळविण्यासाठी अडचणी येत होत्या. हा गुंता सोडविण्यासंबंधी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्ट धारकांना पासपोर्ट रद्द झाल्याच्या दाखल्यावर व्हिजा तसेच ओसीआय कार्ड देण्याच्या निर्णयामुळे गोमंतकीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा लोकहितकारक निर्णय […]