शाळकरी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

ठाणे महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) शाळा (school) क्र. 88 मध्ये दिवा आगासन येथील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेची तातडीने दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शाळेत पोहोचून प्राथमिक तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांची तपासणी करून प्राथमिक उपचार (first aid) केले. या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे (thane) महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) दिवा आगासन येथील शाळा क्र.88 मध्ये, सकाळच्या सत्रात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. मात्र काही वेळाने काही विद्यार्थ्यांना मळमळण्याची लक्षणे दिसू लागली. या घटनेची तात्काळ दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांच्यासह वैद्यकीय पथक शाळेत दाखल झाले. या पथकाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांची (students) तपासणी करून प्राथमिक उपचार केले. काही विद्यार्थ्यांना छत्रपती महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिक्षण उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी माहिती दिली की ठाणे महापालिका प्रशासन आणि रुग्णालयाची तज्ञ टीम रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची काळजी घेत आहे. सदर घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण स्वयंपाकघर व परिसराची तपासणी केली. संपूर्ण चौकशीनंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.हेही वाचा मध्य रेल्वे रेल्वे स्थानकाजवळील एंट्री पॉइंट्स बंद करणार मुंबई पोलिसांकडून महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा

शाळकरी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

ठाणे महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) शाळा (school) क्र. 88 मध्ये दिवा आगासन येथील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेची तातडीने दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शाळेत पोहोचून प्राथमिक तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांची तपासणी करून प्राथमिक उपचार (first aid) केले.या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे (thane) महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) दिवा आगासन येथील शाळा क्र.88 मध्ये, सकाळच्या सत्रात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. मात्र काही वेळाने काही विद्यार्थ्यांना मळमळण्याची लक्षणे दिसू लागली. या घटनेची तात्काळ दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांच्यासह वैद्यकीय पथक शाळेत दाखल झाले.या पथकाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांची (students) तपासणी करून प्राथमिक उपचार केले. काही विद्यार्थ्यांना छत्रपती महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिक्षण उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी माहिती दिली की ठाणे महापालिका प्रशासन आणि रुग्णालयाची तज्ञ टीम रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची काळजी घेत आहे.सदर घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण स्वयंपाकघर व परिसराची तपासणी केली. संपूर्ण चौकशीनंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.हेही वाचामध्य रेल्वे रेल्वे स्थानकाजवळील एंट्री पॉइंट्स बंद करणारमुंबई पोलिसांकडून महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा

Go to Source