धावत्या लोकलमध्ये प्रवाशांवर चाकूने हल्ला

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्लेखोराने तिघाजणांवर चाकू हल्ला केला आहे. यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईत राहणारा 19 वर्षीय शेख जिया हुसेन नावाचा तरुण लोकलने प्रवास करत होता. लोकल कल्याण ते डोंबिवली दरम्यान होती. काही कारणामुळे त्याचा सहप्रवाशांसोबत वाद झाला. यावेळी शेख जिया हुसेनने खिशातला चाकू काढला आणि तीन प्रवाशांवर हल्ला केला.  अक्षय वाघ, हेमंत काकरिया आणि राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये ही घटना घडली. धक्का लागण्यावरून प्रवाशांशी वाद झाला आणि त्याने चाकू हल्ला केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.  डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. “शेखचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु आम्हाला संशय आहे की तो ड्रग्जच्या आहारी आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे,” असे उंद्रे म्हणाले.हेही वाचा विरार : तलावात पोहताना 2 मुलांचा बुडून मृत्यूलग्नाचे खोटे आश्वासन देऊन 15 महिलांचे लैंगिक शोषण

धावत्या लोकलमध्ये प्रवाशांवर चाकूने हल्ला

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्लेखोराने तिघाजणांवर चाकू हल्ला केला आहे. यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईत राहणारा 19 वर्षीय शेख जिया हुसेन नावाचा तरुण लोकलने प्रवास करत होता. लोकल कल्याण ते डोंबिवली दरम्यान होती. काही कारणामुळे त्याचा सहप्रवाशांसोबत वाद झाला. यावेळी शेख जिया हुसेनने खिशातला चाकू काढला आणि तीन प्रवाशांवर हल्ला केला. अक्षय वाघ, हेमंत काकरिया आणि राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये ही घटना घडली. धक्का लागण्यावरून प्रवाशांशी वाद झाला आणि त्याने चाकू हल्ला केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.”शेखचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु आम्हाला संशय आहे की तो ड्रग्जच्या आहारी आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे,” असे उंद्रे म्हणाले.हेही वाचाविरार : तलावात पोहताना 2 मुलांचा बुडून मृत्यू
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन 15 महिलांचे लैंगिक शोषण

Go to Source