ठाणे जिल्ह्याला मेट्रोची आणखीन प्रतिक्षा करावी लागणार
ठाणे (thane) जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो (metro) प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. कल्याण – तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम 3 टक्के इतकीच झाले असून वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी दोन वर्ष तर, ठाणे (thane) – भिवंडी – कल्याण (kalyan) मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.ठाणे जिल्ह्यातील रस्ते तसेच रेल्वे वाहतूकीवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने मुंबईसह (mumbai) ठाणे जिल्ह्यात मेट्रो प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला होता.त्या नुसार, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहेत. मेट्रोच्या माध्यमातून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण मिरारोड यासह तळोजा परिसर एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. परंतु या सर्व प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या (maharashtra) आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.वडाळा – घाटकोपर (ghatkopar) – ठाणे – कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम 2018 मध्ये हाती घेण्यात आले होते. सुमारे 32 किमीचा हा मार्ग असून नोकरदार वर्गासाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या मार्गाची स्थापत्य कामे 75 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित 25 टक्के कामे एप्रिल 2027 मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गालाच जोडण्यात येत असलेल्या 2.7 किमी लांबीच्या कासारवडवली ते गायमुख मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे 86 टक्के पूर्ण झाली आहेत तर, 14 टक्के कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.हेही वाचाधुलीवंदनासाठी पोलिसांकडून महत्त्वाचे आदेश जारीहोळी दरम्यान वृक्षतोड केल्यास ‘इतका’ दंड
Home महत्वाची बातमी ठाणे जिल्ह्याला मेट्रोची आणखीन प्रतिक्षा करावी लागणार
ठाणे जिल्ह्याला मेट्रोची आणखीन प्रतिक्षा करावी लागणार
ठाणे (thane) जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो (metro) प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.
कल्याण – तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम 3 टक्के इतकीच झाले असून वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी दोन वर्ष तर, ठाणे (thane) – भिवंडी – कल्याण (kalyan) मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.ठाणे जिल्ह्यातील रस्ते तसेच रेल्वे वाहतूकीवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने मुंबईसह (mumbai) ठाणे जिल्ह्यात मेट्रो प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला होता.
त्या नुसार, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहेत. मेट्रोच्या माध्यमातून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण मिरारोड यासह तळोजा परिसर एकमेकांना जोडण्यात येणार आहेत.
परंतु या सर्व प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या (maharashtra) आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
वडाळा – घाटकोपर (ghatkopar) – ठाणे – कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम 2018 मध्ये हाती घेण्यात आले होते. सुमारे 32 किमीचा हा मार्ग असून नोकरदार वर्गासाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या मार्गाची स्थापत्य कामे 75 टक्के पूर्ण झाली आहेत.
उर्वरित 25 टक्के कामे एप्रिल 2027 मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या मार्गालाच जोडण्यात येत असलेल्या 2.7 किमी लांबीच्या कासारवडवली ते गायमुख मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे 86 टक्के पूर्ण झाली आहेत तर, 14 टक्के कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.हेही वाचा
धुलीवंदनासाठी पोलिसांकडून महत्त्वाचे आदेश जारी
होळी दरम्यान वृक्षतोड केल्यास ‘इतका’ दंड