ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड

राज्यात पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता हिवाळ्यात झिका विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. ठाणे जिल्हा साथीच्या आजाराशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत आहे. आरोग्य प्रशासनाने ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी विशेष वॉर्ड तयार केला आहे. औषधांचा साठा असलेला 30 खाटांचा आधुनिक वॉर्ड तसेच आपत्कालीन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासन खबरदारी घेत आहे. झिका विषाणूच्या रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईत झिका विषाणूचा फैलाव होत असल्याचे सांगण्यात येत असताना ठाणे जिल्ह्यात झिका उद्रेक झाल्यास तत्काळ उपचार आवश्यक आहेत. त्यामुळे उपचारासाठी लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य 30 खाटा असलेल्या खोलीत सज्ज ठेवण्यात आले आहे.हेही वाचा इन्फ्लूएंझा मृत्यूंमध्ये वाढ; मृत्यूदर गेल्या वर्षीपेक्षा जास्तमुंबईत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड

राज्यात पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता हिवाळ्यात झिका विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. ठाणे जिल्हा साथीच्या आजाराशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत आहे. आरोग्य प्रशासनाने ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी विशेष वॉर्ड तयार केला आहे. औषधांचा साठा असलेला 30 खाटांचा आधुनिक वॉर्ड तसेच आपत्कालीन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासन खबरदारी घेत आहे. झिका विषाणूच्या रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.मुंबईत झिका विषाणूचा फैलाव होत असल्याचे सांगण्यात येत असताना ठाणे जिल्ह्यात झिका उद्रेक झाल्यास तत्काळ उपचार आवश्यक आहेत. त्यामुळे उपचारासाठी लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य 30 खाटा असलेल्या खोलीत सज्ज ठेवण्यात आले आहे.हेही वाचाइन्फ्लूएंझा मृत्यूंमध्ये वाढ; मृत्यूदर गेल्या वर्षीपेक्षा जास्त
मुंबईत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

Go to Source