ठळकवाडी, केएलई संघ उपात्य फेरीत

हनुमान चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित हनुमान चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात झालेल्या सामन्यातून ठळकवाडी संघाने केएलई इंटरनॅशनल ब संघाचा, केएलई इंटरनॅशनल अ संघाने केंद्रीय विद्यालयाचा पराभव करून पुढील प्रवेश केला. ऋषभ वस्तवाडकर व मोहम्मद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भाग्यनगर येथील एसकेई प्लॅटिनम जुबली मैदानावरती […]

ठळकवाडी, केएलई संघ उपात्य फेरीत

हनुमान चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित हनुमान चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात झालेल्या सामन्यातून ठळकवाडी संघाने केएलई इंटरनॅशनल ब संघाचा, केएलई इंटरनॅशनल अ संघाने केंद्रीय विद्यालयाचा पराभव करून पुढील प्रवेश केला. ऋषभ वस्तवाडकर व मोहम्मद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भाग्यनगर येथील एसकेई प्लॅटिनम जुबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 118 धावा केल्या. त्यात विराज बस्तवाडकरने 2 चौकारांसह नाबाद 27, श्री उंदरेने 18, वेदांत पोटेने 16 , तर प्रज्योत उगाडेने 12 धावा केल्या. केएलई इंटरनॅशनल ब तर्फे देवनीस हेगडेने 20 धावा 2, कौस्तुभ पाटील, सलमान, सुदर्शन मगदूम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई इंटरनॅशनल ब संघाने 20 षटकात 8 गडीबाद 59 धावा केल्या. त्यात कौस्तुभ पाटीलने 12 धावा केला. ठळकवाडी तर्फे रोहित जाधव, श्रेयश, मयूर जाधव, प्रज्योत उगाडे यांनी प्रत्येकी गडी बाद केला दुसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 119 धावा केल्या. त्यात मोहम्मद हमजाने 5 चौकारांसह 40, शिवम खोत व अतीत भोगण यांनी 2 चौकारांसह प्रत्येकी 22 धावा केल्या. केंद्रीय विद्यालय तर्फे यश व निखिल यांनी प्रत्येकी 2 तर गौतम व प्रवीण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केंद्रीय विद्यालयाचा डाव 13.3 षटकात सर्व गडीबाद 53 धावात आटोपला. त्यात स्वरूप बी.ने 12 धावा केल्या. केएलईतर्फे मोहम्मद हमजा व अब्राज कुरेशी यांनी प्रत्येकी 2 तर स्वयंम खोत व अतिथ भोगण यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.