थायलंड महिला संघाचा मलेशियावर विजय

वृत्तसंस्था/डंबुला (लंका) येथे सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात थायलंडने मलेशियाचा 22 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात थायलंडच्या के. नेनापतला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 133 धावा जमविल्या. त्यानंतर मलेशियाने 20 षटकात 8 […]

थायलंड महिला संघाचा मलेशियावर विजय

वृत्तसंस्था/डंबुला (लंका)
येथे सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात थायलंडने मलेशियाचा 22 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात थायलंडच्या के. नेनापतला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 133 धावा जमविल्या. त्यानंतर मलेशियाने 20 षटकात 8 बाद 111 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 22 धावांनी गमवावा लागला. या सामन्यात थायलंडला दोन गुण मिळाले.
थायलंडच्या डावामध्ये के. नेनापतने 35 चेंडूत 6 चौकारांसह 40, मायाने 3 चौकारासह 29, बी. नाट्याने 4 चौकारांसह 18, के. सुवाननने नाबाद 14 तर कानोने 1 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. मलेशियातर्फे इस्माईलने 16 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मलेशियाच्या डावामध्ये वान ज्युलियाने एकाकी लढत देत अर्धशतक झळकविले पण ते वाया गेले. ज्युलियाने 53 चेंडूत 6 चौकारांसह 52 तर कर्णधार दुराईसिंगमने 22 धावा जमविल्या. थायलंडतर्फे के. ओनीच्याने 20 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – थायलंड 20 षटकात 6 बाद 133 (के. नेनापत 40, माया 29, इस्माईल 3-16), मलेशिया 20 षटकात 8 बाद 111 (ज्युलिया 52, दुराईसिंगम 22, के. ओनीच्या 2-20).