Kolhapur : ठाकरे शिवसेना आ. यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडीबरोबर !
शिरोळ तालुक्यातीलत पालिका निवडणुकीतील नव्या राजकीय समीकरणांना वेग
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग येत असून शाहू आघाडीची बाजू अधिक भक्कम होत चालली आहे.
काल रविवारी सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संघटक वैभव उगळे, तसेच कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासो सावगावे यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या महायुती राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शवून शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील महायुती राजर्षी शाहू आघाडीची ताकद लक्षणीय वाढली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका निर्णायक टप्यावर पोहोचल्या आहेत.
याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही गट-तटाचा विचार न करता शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहोत. शहराच्या प्रगतीसाठी जे लोक विश्वासाने पुढे येत आहेत त्यांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. याप्रसंगी रामचंद्र डांगे, जवाहर पाटील, चंद्रकांत जोंग, दीपक गायकवाड, अजित देसाई, उदय डांगे, बाळासो गायकवाड यांसह दत्तात्रय कामत, ठाकरे गट व शाहू आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी Kolhapur : ठाकरे शिवसेना आ. यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडीबरोबर !
Kolhapur : ठाकरे शिवसेना आ. यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडीबरोबर !
शिरोळ तालुक्यातीलत पालिका निवडणुकीतील नव्या राजकीय समीकरणांना वेग कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग येत असून शाहू आघाडीची बाजू अधिक भक्कम होत चालली आहे. काल रविवारी सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संघटक वैभव उगळे, तसेच कुरुंदवाड […]
