तुर्कस्तानच्या लष्करी तळावर इराकमध्ये दहशतवादी हल्ला
एर्दोगनच्या लष्कराचे 5 सैनिक ठार
► वृत्तसंस्था/ इस्तंबूल
उत्तर इराकमधील अर्ध-स्वायत्त कुर्द प्रदेशातील लष्करी तळावर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच तुर्की सैनिक ठार झाले. तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी कुर्दिश सैनिकांना जबाबदार धरले आहे. हल्लेखोरांनी लष्करी तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आठ सैनिक जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी झाल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर सांगितले. जखमी जवानांना उपचारासाठी ऊग्णालयात दाखल करण्यात आले.
उत्तर इराकमध्ये ‘पीकेके’चा गड आहे. याने तुर्कस्तानमध्ये दशकभर चाललेल्या बंडखोरीचे नेतृत्व केले असून अमेरिकेसह तुर्कीच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी ‘पीकेके’ला दहशतवादी संघटना मानले आहे. परराष्ट्र मंत्री हकन फिदान यांनी नंतर हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. तीन आठवड्यांपूर्वी उत्तर इराकमध्ये 12 तुर्की सैनिक मारले गेल्यापासून चकमकी सुरू झाल्या.
Home महत्वाची बातमी तुर्कस्तानच्या लष्करी तळावर इराकमध्ये दहशतवादी हल्ला
तुर्कस्तानच्या लष्करी तळावर इराकमध्ये दहशतवादी हल्ला
एर्दोगनच्या लष्कराचे 5 सैनिक ठार ► वृत्तसंस्था/ इस्तंबूल उत्तर इराकमधील अर्ध-स्वायत्त कुर्द प्रदेशातील लष्करी तळावर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच तुर्की सैनिक ठार झाले. तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी कुर्दिश सैनिकांना जबाबदार धरले आहे. हल्लेखोरांनी लष्करी तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आठ सैनिक जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी […]
