Sangli News | बागणी–आष्टा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

                                                       आष्टा परिसरात शोककळा आष्टा : बागणी-आष्टा मार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकी झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. संदेश मिथुन भंडारे (वय २१) आणि प्रसाद सुनील […]

Sangli News | बागणी–आष्टा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

                                                       आष्टा परिसरात शोककळा
आष्टा : बागणी-आष्टा मार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकी झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. संदेश मिथुन भंडारे (वय २१) आणि प्रसाद सुनील बामणे (वय २०) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे बागणी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश भंडारे आणि प्रसाद बामणे हे दोघे शुक्रवारी रात्री दुचाकीवरून बागणीकडून आष्ट्याकडे जात होते. प्रवासादरम्यान चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने वेगात असलेली गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांनाही संदेश भंडारे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर मृत संदेश भंडारे याचे कुटुंब मूळचे मालगाव (ता. मिरज) येथील आहे. रोजगाराच्या निमित्ताने हे कुटुंब अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच बागणीयेथे स्थायिक झाले होते. नवीन ठिकाणी स्थिरावत असतानाच कुटुंबातील तरुण मुलाचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने भंडारे कुटुंबावर दुःखाचा प्रसाद बामणे डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. अपघाताची नोंद उशिरापर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. आष्टा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.