तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता
Kids story: हिवाळ्याचे दिवस सुरु होते. महाराज कृष्णदेव आपल्या काही मंत्र्यांसह कामानिमित्त नगरीबाहेर जात होते. खूप जास्त थंडी असल्यामुळे सगळे दरबारी थरथर कापत होते. चालत असतांना राजाची नजर एका म्हाताऱ्या भिकाऱ्यावर पडली जो दगडावर बसून कडाक्याच्या थंडीत थरथर कापत होता. आता भिकाऱ्याची अशी अवस्था पाहून राजाला त्याच्यावर दया आली. राजाने आपली मौल्यवान शाल काढून त्या म्हाताऱ्या भिकाऱ्यावर पांघरली. राजाची हे ही उदारता पाहून आजूबाजूचे सर्व दरबारी स्तुती करू लागले आणि जयजयकार करू लागले. पण तेव्हा तेनालीरामन एकटाच शांत उभा होता. तेनालीराम गप्प असल्याचे पाहून राजपुत्राला बोलण्याची संधी मिळाली. तो रागाने म्हणाला तेनालीरामन काय हरकत आहे, महाराजांच्या या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहे? फक्त तू गप्प आहेस. महाराजांच्या उदारता बद्दल काही शंका आहे का? तेनालीराम अजूनही गप्पच होते. आता राजालाही तेनालीरामच्या मौनाने अस्वस्थ वाटू लागले. तेथून ते पुन्हा राजवाड्यात परतले.
दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार भरला होता. तेव्हा पहिल्या व्यक्तीने तेनालीरामला उद्देशून विचारले तुला स्वतःचा अभिमान वाटू लागला आहे. म्हणुनच काल तू शांतपणे उभा होतास. राजाने विचारल्यावरही तेनालीराम काहीच बोलला नाही. आता राजाला क्रोध आला आणि त्यांनी तेनालीरामला देशातून एक वर्षासाठी हद्दपार कर करण्याची शिक्षा केली. तेव्हा राजा तेनालीरामला म्हणाले की, मला सांग, तुला सोबत काय घ्यायचे आहे?” तेनालीरामन हसत हसत म्हणाले “महाराज, तुमची शिक्षाही माझ्यासाठी पुरस्कारासारखी आहे. पण तुम्ही परवानगी दिलीत तर मला ती शॉल माझ्यासोबत घ्यायची आहे. जी तुम्ही काल त्या वृद्ध भिकाऱ्याला दिलीत.” तेनालीचे बोलणे ऐकून दरबारात उपस्थित असलेले सर्व दरबारी आणि राजा स्तब्ध झाले. दिलेली शॉल परत कशी मागायची? तसे करणे हा राजाचा अपमान होईल. राजाने त्या वृद्ध भिकाऱ्याला शालीसह दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. व सैनिकांनी वृद्ध भिकाऱ्याला राजदरबारात आणले. राजा कृष्णदेव भिकाऱ्याला म्हणाले – “आम्ही काल दिलेली शॉल परत कर. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला इतर मौल्यवान कपडे आणि शॉल देऊ.” राजाचे बोलणे ऐकून तो भिकारी घाबरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. शिपायांनी विचारले असता तो म्हणाला महाराज, मी ती शॉल विकून भाकरी खाल्ली. वृद्ध भिकाऱ्याचे हे ऐकून राजाला क्रोध आला. पण राजने त्या म्हाताऱ्या भिकारीला जाण्यास सांगितले. आता तेनालीराम कडे बघून राजा म्हणाला की“आम्हाला सरळ उत्तर दे, काल गप्प का होतास? तुला काल आमचं काम आवडलं नाही का?” यावर तेनाली राम हात जोडून म्हणाला “माफ करा! महाराज!, माझ्या मौनाचे उत्तर तुम्हाला भिकाऱ्याकडून मिळाले आहे. भिकाऱ्याला महागड्या शालची गरज नसून पोट भरण्यासाठी भाकरीची गरज होती. मी तुम्हाला शॉल देण्यापासून थांबवू शकलो नाही, म्हणून मी गप्प राहिलो. राजा कृष्णदेव राय यांना तेनालीरामचे म्हणणे पटले. त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्र्यांना नगरीमध्ये अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले की, नागरवासियांना पोट भरण्यासाठी भीक मागावी लागू नये.
Edited By- Dhanashri Naik