युएईत 6 वर्षांमध्ये पूर्ण झाले मंदिर

700 कोटीचा खर्च : 27 एकर क्षेत्रात फैलाव : 14 फेब्रुवारीला उद्घाटन वृत्तसंस्था/अबुधाबी संयुक्त अरब अमिरात या देशातील अबुधाबीमध्ये राम मंदिरासारखे भव्य मंदिर निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिनी प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. हिंदू मंदिराची उभारणी अबुधाबीच्या कल्चरल डिस्ट्रिक्टमध्ये 27 […]

युएईत 6 वर्षांमध्ये पूर्ण झाले मंदिर

700 कोटीचा खर्च : 27 एकर क्षेत्रात फैलाव : 14 फेब्रुवारीला उद्घाटन
वृत्तसंस्था/अबुधाबी
संयुक्त अरब अमिरात या देशातील अबुधाबीमध्ये राम मंदिरासारखे भव्य मंदिर निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिनी प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. हिंदू मंदिराची उभारणी अबुधाबीच्या कल्चरल डिस्ट्रिक्टमध्ये 27 एकर क्षेत्रात करण्यात आली आहे.
याच्या निम्म्या हिस्स्यात पार्किंग असून या मंदिरासाठी 6 वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. मंदिराच्या मुख्य गुंबदात पृथ्वी, जल, अग्नि, आकाश आणि वायुसाब्sात अरबी स्थापत्यकलेत चंद्र दर्शविण्यात आला असून याचे मुस्लीम समुदायातही अत्यंत महत्त्व आहे. हे मंदिर सर्व धर्मीयांचे स्वागत करणार असून भारत आणि अरब संस्कृतीच्या मिलापाचे हे उदाहरण ठरणार आहे.
केवळ दगडाद्वारे निर्मिती
अबुधाबीत हे मंदिर उभारण्यासाठी लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. या मंदिर उभारणीसाठी 700 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. स्तंभापासून छतापर्यंत नक्षीकाम करण्यात आले असून 700 कंटेनर्समध्ये 20 हून अधिक टनाचे शिला, संगमरमर भारतातून आणले गेले आहे. या मंदिरात एकाचवेळी 10 हजार भाविक सामावले जाऊ शकतात. मंदिराच्या प्रांगणात एक वॉल ऑफ हार्मनीची निर्मिती करण्यात आली आहे. मंदिराच्या भिंतींव अरबी क्षेत्र, चिनी, एज्टेक आणि मेसोपोटामियातील 14 कहाण्या असून त्या सर्व संस्कृतीशी संबंध दर्शविणाऱ्या असतील. हे मंदिर युएईत सौहार्द आणि सह-अस्तित्वाच्या धोरणाचे उदाहरण ठरणार आहे.
1997 मध्ये पाहिले होते मंदिराचे स्वप्न
बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रमुख ब्रह्मविहारी स्वामी यांनी हे अरब देशांमध्ये पहिले विचार आधारित बीएपीएस असेल असे म्हटले आहे. 1997 मध्ये गुरु प्रमुख स्वामी महाराज जेव्हा युएईत आले होते, तेव्हा त्यांनी तेथे हिंदू मंदिर उभारणीचे स्वप्न बाळगले होते. आज 27 वर्षांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे ब्रह्मविहारी स्वामी यांनी म्हटले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर वाळूच्या टेकडीसारखी रचना करण्यात आली आहे. तर त्यानंतर गंगा, यमुना आणि सरस्वतीचे संगमक्षेत्र तयार करण्यात आले असून मुख्य प्रवेशद्वारापूर्वी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला गंगा आणि यमुनेचा प्रवाह असेल तर सरस्वती नदीची कल्पना एका लाइटद्वारे करण्यात आली आहे. मंदिराच्या मार्गावर थंड राहणाऱ्या नॅनो टाइल्स बसविण्यात आल्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला गंगा घाट असून त्यात गंगेच्या जलाची व्यवस्था असणार आहे.
7 एमिरेट्स दर्शविणारे 7 शिखर
मंदिरात 7 शिखरं असून ती युएईतील सात एमिरेट्स दर्शविणारी आहेत. मंदिरात सात देवता विराजमान होतील, यात राम-सीता, शिव-पार्वती यांचा समावेश आहे. बाहेरील भिंतींवर हँडक्राफ्टद्वारे महाभारत, गीतेतील कहाण्या रेखाटण्यात आल्या आहेत. भिंतींवर दगडांमध्ये पूर्ण रामायण, जगन्नाथ यात्रा आणि शिवपुराण देखील कोरण्यात आले आहे. पूर्ण अयोध्या नगरीला दगडांच्या संरचनेत 3 डी मॉडेलमध्ये कोरण्यात आले आहे.