9 राज्यांमध्ये 42 अंशावर तापमान

ओडिशात 45 अंशाहून अधिक तापमान : बिहार-झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हवामान विभागाने देशातील 4 राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून यात बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल सामील आहे. या राज्यांमध्ये तापमान 42 अंशाच्या पार पोहोचले आहे. याचबरोबर छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पु•gचेरी, गुजरात आणि महाराष्ट्रातही तापमान 42 अंशानजीक नोंदविले […]

9 राज्यांमध्ये 42 अंशावर तापमान

ओडिशात 45 अंशाहून अधिक तापमान : बिहार-झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवामान विभागाने देशातील 4 राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून यात बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल सामील आहे. या राज्यांमध्ये तापमान 42 अंशाच्या पार पोहोचले आहे. याचबरोबर छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पु•gचेरी, गुजरात आणि महाराष्ट्रातही तापमान 42 अंशानजीक नोंदविले गेले आहे.
ओडिशाच्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशाच्या समीप पोहोचले आहे. बारिपाडा जिल्ह्यात शनिवारी तापमान 45.2 अंश नोंद झाले आहे. हवामान विभागानुसार येथे आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. राजधानी दिल्लीतही तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. तेथे तापमान 38 अंशावर पोहोचण्याचे अनुमान आहे. तसेच 30 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात.
देशात उष्णतेच्या लाटेसोबत 26 राज्यांमध्ये पावसाचेही अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा सामील आहे.
22 एप्रिल : पश्चिम बंगाल, ओडिशात हीटवेव्ह
ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आसाममध्ये वीज कोसळणे आणि धूळयुक्त वारे वाहण्याचे अनुमान आहे. तर अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशात उष्णतेची लाट असू शकते. केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, प्•ुgचेरीमध्ये तीव्र उष्णता राहू शकते.
23 एप्रिल : बिहारमध्ये उष्णतेची लाट
मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि तेलंगणात धूळयुक्त वारे वाहू शकतात. हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड, अरुणाचल प्रदेश, अरुणाचलसह ईशान्येतील अन्य राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये उष्णतेची लाट राहणार असून आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि पु•gचेरीत तीव्र उष्णतेची स्थिती राहू शकते.
24 एप्रिल : ईशान्येत जोरदार पाऊस
ईशान्येतील आसाम, मेघालय आणि मिझोरममध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. नागालँड, मिझोरम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये वादळी वारे वाहण्याचे अनुमान आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहणार आहे. केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत तीव्र उष्णतेची स्थिती राहणार आहे.