तेजस शिरसेचा नवा राष्ट्रीय विक्रम

वृत्तसंस्था /जेवेस्केला (फिनलँड) भारताचा धावपटू 21 वर्षीय तेजस शिरसेने पुरुषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम करत येथे सुरु असलेल्या मोटोनेट जीपी सिरिज विश्व अॅथलेटिक्स टूर चॅलेंजर स्तरावरील अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. 21 वर्षीय तेजसने पुरुषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीमध्ये यापूर्वी सिद्धार्थ थिंगलियाने नोंदविलेला 13.56 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. तेजसने या क्रीडा प्रकारात […]

तेजस शिरसेचा नवा राष्ट्रीय विक्रम

वृत्तसंस्था /जेवेस्केला (फिनलँड)
भारताचा धावपटू 21 वर्षीय तेजस शिरसेने पुरुषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम करत येथे सुरु असलेल्या मोटोनेट जीपी सिरिज विश्व अॅथलेटिक्स टूर चॅलेंजर स्तरावरील अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. 21 वर्षीय तेजसने पुरुषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीमध्ये यापूर्वी सिद्धार्थ थिंगलियाने नोंदविलेला 13.56 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. तेजसने या क्रीडा प्रकारात 13.41 सेकंदाचा अवधी घेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. अलिकडेच झालेल्या फेडरेशनच चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजसने सुवर्णपदक मिळविले आहे. पॅरिस ऑलिम्पिसाठी पुरुषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीसाठी पात्रतेची मर्यादा 13.27 सेकंद आहे. फिनलँडमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताची महिला धावपटू ज्योती याराजीने महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत 12.78 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. मात्र पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेची मर्यादा थोडक्यात हुकली. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 12.77 सेकंद अशी होती.