गोंदियामध्ये वेगवान ट्रक ने शिक्षिकेला धडक दिली, 100 मीटर पर्यंत फरफटत नेले, जागीच ठार

गोंदिया शहरात रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत राणी अवंतीबाई चौकात आज सकाळी हिट अँड रनचे प्रकरण समोर आले असून भरधाव येणाऱ्या ट्रकने शाळेच्या दिशेने रस्त्याच्या कडेने जात असलेल्या शिक्षिकेला धडक दिली. ट्रॅकने तिला 100 मीटर पर्यंत फरफटतनेले त्यात महिलेचा …

गोंदियामध्ये वेगवान ट्रक ने शिक्षिकेला धडक दिली, 100 मीटर पर्यंत फरफटत नेले, जागीच ठार

गोंदिया शहरात रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत राणी अवंतीबाई चौकात आज सकाळी हिट अँड रनचे प्रकरण समोर आले असून भरधाव येणाऱ्या ट्रकने शाळेच्या दिशेने रस्त्याच्या कडेने जात असलेल्या शिक्षिकेला धडक दिली. ट्रॅकने तिला 100 मीटर पर्यंत फरफटतनेले त्यात महिलेचा मृत्यू झाला.

अपघातांनंतर ट्रक चालक पसार झाला. पण अवघ्या काही तासांतच तो पोलिसांच्या ताब्यात आला. अलवींना जेम्स लुईस असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या शाळेत शिक्षिका होत्या आणि नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने जात असताना भरधाव येणाऱ्या एका ट्रक ने त्यांना धडक दिली. त्यांना ट्रक ने चिरडले आणि 100 मीटर पर्यंत फरफटत नेले. त्या ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातांनंतर ट्रक चालक पसार झाला मात्र गोंदिया पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्याला अटक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करत आहे. 

Edited by – Priya Dixit   

Go to Source