मोटारसायकलवरून पडल्यानंतर बसने चिरडल्याने शिक्षिकेचा अंत
अम्मीनभावीनजीक शिरगुप्पीच्या महिलेचा बळी
बेळगाव : अम्मीनभावी, ता. हुक्केरीजवळ मोटारसायकलवरून पडल्यानंतर परिवहन मंडळाची बस अंगावरून गेल्याने शिरगुप्पी, ता. कागवाड येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली असून संकेश्वर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. सुवर्णा मल्लाप्पा मोने (वय 37) राहणार शिरगुप्पी, ता. कागवाड असे त्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. मोटारसायकलवरून बेळगावकडे येताना अम्मीनभावीजवळ सुवर्णा मोटारसायकलवरून खाली पडल्या. त्यांच्याच नात्यातील सुरेश देवाप्पा भनाज, राहणार शिरगुप्पी हा मोटारसायकल चालवत होता. मोटारसायकलवरून रस्त्यावर पडलेल्या सुवर्णा यांच्यावर बेळगावहून चिकोडीकडे जाणारी बस गेली. या अपघातात शिक्षिका सुवर्णा यांचा मृत्यू झाला. संकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी मोटारसायकलवरून पडल्यानंतर बसने चिरडल्याने शिक्षिकेचा अंत
मोटारसायकलवरून पडल्यानंतर बसने चिरडल्याने शिक्षिकेचा अंत
अम्मीनभावीनजीक शिरगुप्पीच्या महिलेचा बळी बेळगाव : अम्मीनभावी, ता. हुक्केरीजवळ मोटारसायकलवरून पडल्यानंतर परिवहन मंडळाची बस अंगावरून गेल्याने शिरगुप्पी, ता. कागवाड येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली असून संकेश्वर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. सुवर्णा मल्लाप्पा मोने (वय 37) राहणार शिरगुप्पी, ता. कागवाड असे त्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. मोटारसायकलवरून बेळगावकडे येताना अम्मीनभावीजवळ सुवर्णा मोटारसायकलवरून […]
