टीसीएचने कमावला 61 हजार कोटीचा महसूल

मुंबई आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएसने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीतील नफ्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत 9 टक्के वाढीसोबत 12हजार 432कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर 61237 कोटी रुपयांचा महसूल याच कालावधीमध्ये कंपनीने प्राप्त केला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून टीसीएसचा उल्लेख केला जातो. […]

टीसीएचने कमावला 61 हजार कोटीचा महसूल

मुंबई
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएसने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीतील नफ्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत 9 टक्के वाढीसोबत 12हजार 432कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर 61237 कोटी रुपयांचा महसूल याच कालावधीमध्ये कंपनीने प्राप्त केला आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून टीसीएसचा उल्लेख केला जातो. शुक्रवारी नफ्यासंदर्भातील माहिती टीसीएसने शेअर बाजाराला दिली. कंपनीने चौथ्या तिमाहीत आपल्या महसुलामध्ये 3.5टक्के वाढ नोंदली आहे. याचदरम्यान टीसीएसच्या संचालक मंडळाने प्रती समभाग 28 रुपये इतका अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी टीसीएसच्या समभागामध्ये हलकीशी वाढ दिसून आली. समभाग 0.45 टक्के वाढत 4 हजार रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.