माणिकबाग ऑटोमोबाईल्समध्ये टाटा पंच इव्ही कारचा शुभारंभ

बेळगाव : टाटा मोटर्स व माणिकबाग ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन टाटा पंच या इलेक्ट्रिक कारचा शुभारंभ नुकताच उद्यमबाग येथील शोरूममध्ये करण्यात आला. अत्याधुनिक फिचर्सचा समावेश टाटा मोटर्सने या कारमध्ये केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ नागेश मुंडास, माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस […]

माणिकबाग ऑटोमोबाईल्समध्ये टाटा पंच इव्ही कारचा शुभारंभ

बेळगाव : टाटा मोटर्स व माणिकबाग ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन टाटा पंच या इलेक्ट्रिक कारचा शुभारंभ नुकताच उद्यमबाग येथील शोरूममध्ये करण्यात आला. अत्याधुनिक फिचर्सचा समावेश टाटा मोटर्सने या कारमध्ये केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ नागेश मुंडास, माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, टाटा मोटर्सचे सुदर्शन साहू, माणिकबाग समूहाचे संचालक भूषण मिरजी, रमेश शहा, शील मिरजी, स्वप्निल शहा, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर प्रभू, शैलेश खटावकर, विश्वनाथ  बुटकी यांसह इतर उपस्थित होते.