टाटा रुग्णालयाचे डॉक्टर देणार जगातील डॉक्टरांना प्रशिक्षण

कर्करोगाला हद्दपार करण्यासाठी आता मुंबईतील (mumbai) टाटा रुग्णालयातील (tata hospital) तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहेत. टाटा रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या माध्यमातून ‘रेझ ऑफ होप’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार टाटा रुग्णालयाची ‘अँकर सेंटर’ म्हणून निवड झाली आहे. या सामंजस्य करारावर टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी स्वाक्षरी केली.जगभरात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे (cancer) प्रमाण अधिक आहे. त्यावर उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयामध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच टाटा रुग्णालयाकडून मोफत व स्वस्त दरात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णांवरील उपचाराचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव अन्य देशातील डॉक्टरांना (doctors) मार्गदर्शक ठरावा यासाठी टाटा रुग्णालय व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये करण्यात आला आहे. त्या सामंजस्य करारानुसार अन्य देशातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, रेडिओथेरपी मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट फिजिशियन यांना प्रशिक्षण (training) देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्करोगाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्यास मदत होणार आहे. तसेच या डॉक्टरांचा उपयोग संशोधन करण्यासाठी करण्यात येणार असल्याने प्रत्येक देशात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.हेही वाचा HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून कोकणात विशेष ट्रेन

टाटा रुग्णालयाचे डॉक्टर देणार जगातील डॉक्टरांना प्रशिक्षण

कर्करोगाला हद्दपार करण्यासाठी आता मुंबईतील (mumbai) टाटा रुग्णालयातील (tata hospital) तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहेत. टाटा रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या माध्यमातून ‘रेझ ऑफ होप’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार टाटा रुग्णालयाची ‘अँकर सेंटर’ म्हणून निवड झाली आहे. या सामंजस्य करारावर टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी स्वाक्षरी केली.जगभरात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे (cancer) प्रमाण अधिक आहे. त्यावर उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयामध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच टाटा रुग्णालयाकडून मोफत व स्वस्त दरात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णांवरील उपचाराचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव अन्य देशातील डॉक्टरांना (doctors) मार्गदर्शक ठरावा यासाठी टाटा रुग्णालय व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये करण्यात आला आहे. त्या सामंजस्य करारानुसार अन्य देशातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, रेडिओथेरपी मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट फिजिशियन यांना प्रशिक्षण (training) देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्करोगाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्यास मदत होणार आहे. तसेच या डॉक्टरांचा उपयोग संशोधन करण्यासाठी करण्यात येणार असल्याने प्रत्येक देशात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.हेही वाचाHSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढउन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून कोकणात विशेष ट्रेन

Go to Source