टाटा समूह पेगॉट्रॉनचे नियंत्रण मिळवण्यासाठी उत्सुक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयफोन निर्मिती कारखान्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी टाटा समूह उत्सुक असल्याची माहिती मिळते आहे. आयफोन निर्मिती कंपनी अॅपल सध्याला भारतामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी जंगी प्रयत्न करते आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून टाटा समूहाने आपला हात पुढे केला आहे. आयफोनची निर्मिती करणाऱ्या पेगाट्रॉन कॉर्पोरेशनचे अधिग्रहण करण्यासाठी टाटा समूहाने पुढाकार घेतला असल्याचे समजते. यासाठी टाटा समूह […]

टाटा समूह पेगॉट्रॉनचे नियंत्रण मिळवण्यासाठी उत्सुक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन निर्मिती कारखान्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी टाटा समूह उत्सुक असल्याची माहिती मिळते आहे. आयफोन निर्मिती कंपनी अॅपल सध्याला भारतामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी जंगी प्रयत्न करते आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून टाटा समूहाने आपला हात पुढे केला आहे.
आयफोनची निर्मिती करणाऱ्या पेगाट्रॉन कॉर्पोरेशनचे अधिग्रहण करण्यासाठी टाटा समूहाने पुढाकार घेतला असल्याचे समजते. यासाठी टाटा समूह पेगाट्रॉन सोबत एक करारही करू शकते असे म्हटले जात आहे. या करारासंदर्भामध्ये अंतिम निर्णय हा मे महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो. जर का हा करार अंतिम झाला तर अॅपल इंक आणि टाटा समूह यांच्यातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे.
 पेगाट्रॉनची ओळख
अॅपल कंपनीचे हँडसेट असेंबल करणारी पेगाट्रॉन ही तैवानची कंपनी आहे. यामध्ये टाटा समूहाला हिस्सेदारी घ्यायची आहे. यांचा उत्पादन कारखाना तामिळनाडूतील चेन्नई येथे कार्यरत आहे. लवकरच दुसराही कारखाना सुरू केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. करार एकदा का अंतिम झाला की नंतरच्या कालावधीमध्ये पेगाट्रॉन कंपनी टाटा समूहाला निर्मिती कार्यामध्ये मदतीचा हात देऊ शकते.