बांद्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा

सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांची बांदा पोलीस निरीक्षकांकडे मागणी सावंतवाडी । प्रतिनिधी बांदयातील दारू ,जुगार ,मटका हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी बांदा पोलीस निरीक्षक बडगे यांना भेटून बुधवारी केली. यासंदर्भात त्यांनी पुरावे सादर केले. निरीक्षक बडवे यांनी आठ दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन कल्याणकर […]

बांद्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा

सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांची बांदा पोलीस निरीक्षकांकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
बांदयातील दारू ,जुगार ,मटका हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी बांदा पोलीस निरीक्षक बडगे यांना भेटून बुधवारी केली. यासंदर्भात त्यांनी पुरावे सादर केले. निरीक्षक बडवे यांनी आठ दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन कल्याणकर यांना दिले आहे. बांदा पोलीस ठाण्यातून कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे साईप्रसाद कल्याणकर यांनी सांगितले.