सावंतवाडी तालुक्यातील १०० टक्के वसुली केलेल्या १६ संस्थांचा गौरव

माजगाव येथे प्राथमिक विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रम संपन्न ; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी) येत्या आर्थिक वर्षात सर्व विकास सोसायटी यांचे संगणकीकरण होणार आहे. या माध्यमातून विकास सोसायटी यांचा ताळेबंद तत्काळ कळणार आहे. विकास सोसायटी आणि डिसेंबर अखेर आपला ताळेबंद व्यवस्थित करावा, संगणकीकरणामुळे विकास सोसायट्यांच्या कारभारात पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे विकास सोसायटीच्या संचालक […]

सावंतवाडी तालुक्यातील १०० टक्के वसुली केलेल्या १६ संस्थांचा गौरव

माजगाव येथे प्राथमिक विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रम संपन्न ; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आयोजन
सावंतवाडी (प्रतिनिधी)
येत्या आर्थिक वर्षात सर्व विकास सोसायटी यांचे संगणकीकरण होणार आहे. या माध्यमातून विकास सोसायटी यांचा ताळेबंद तत्काळ कळणार आहे. विकास सोसायटी आणि डिसेंबर अखेर आपला ताळेबंद व्यवस्थित करावा, संगणकीकरणामुळे विकास सोसायट्यांच्या कारभारात पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे विकास सोसायटीच्या संचालक मंडळाने सतर्क राहून कारभार केला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले. माजगाव येथे रविवारी सिद्धिविनायक हॉलमध्ये प्राथमिक विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले होते.
दळवी यांनी आम्ही फक्त घोषणा करून थांबलो नाही . आम्ही स्वतःच्या नफ्यातून काही रक्कम भेट संस्थांना देण्याचा निर्णय घेतला.विकास संस्था सक्षम झाल्या तर खऱ्या अर्थाने शेतकरी सक्षम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व काजू विकास संस्था मार्फत खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. कॅनिंग सुद्धा संस्थांच्या वतीने व्हावी  त्यासाठी गोदाम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास संस्थांच्या मागे जिल्हा बँक सदैव राहील.जिल्हा बँक म्हणून प्रत्येक पावलावर आम्ही तुमच्या मागे आहोत.केंद्रसरकार विकास संस्थाना आर्थिक केंद्र बिंदू म्हणून पहात आहेत्यानुसार केंद्र सरकार आपलं धोरण तयार करत आहे. आपलं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर यापेक्षा चांगली संधी नाही. अधिकचा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांनी दोन पाच रुपये देऊन या संस्था उभ्या केल्या आहेत. आणी या शेतकऱ्यांचा कणा बनून आपण काम केलं पाहिजे. आपल्याला सहकाराची साखळी मजबूत करायची आहे.असे प्रयत्न  करायचे आहेत असे दळवी म्हणाले. यावेळी मनिष दळवी बोलत होते. मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक गजानन गावडे,महेश सारंग,रविंद्र मडगांवकर, विद्याधर परब, बँकेचे माजी संचालक गुरूनाथ पेडणेकर, सावंतवाडी ख.वि.संघअध्यश प्रमोद गावडे,जिल्हा बॅकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,क्षेत्र वसुली उपसरव्यवस्थापक दत्ताराम गावडे,कर्ज विभाग प्रमुख श्री. के बी.वरक, संगणक संस्था प्रमुख श्री.वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी व्ही एन डोर्लेकर,विकासअधिकारी,  संजय डंबे,सौ.सोनाली चव्हाण, सावंतवाडी शाखा व्यवस्थापक अमोल शिंदे,तसेच संस्था अध्यश,उपाध्यश सचिव संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.