दिवाणखवटी बोगद्यानजीक रेल्वे रुळावर भराव !

मांडवीसह नेत्रावती एक्सप्रेस रखडली प्रतिनिधी खेड मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक मातीचा भराव रेल्वे रुळावर कोसळला. रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात तर नेत्रावती एक्सप्रेस विन्हेरे स्थानकात थांबवण्यात आली. सावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या प्रवाशांचीही रखडपट्टी झाली. रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने मातीचा भराव हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले […]

दिवाणखवटी बोगद्यानजीक रेल्वे रुळावर भराव !

मांडवीसह नेत्रावती एक्सप्रेस रखडली
प्रतिनिधी
खेड
मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक मातीचा भराव रेल्वे रुळावर कोसळला. रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात तर नेत्रावती एक्सप्रेस विन्हेरे स्थानकात थांबवण्यात आली. सावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या प्रवाशांचीही रखडपट्टी झाली. रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने मातीचा भराव हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले होते.मुसळधार पावसामुळे पाच दिवसांपूर्वी गोवा-पेडणे येथील बोगद्यात चिखल आणि माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.