बावळाट- केसरी पुलावरील भगदाड बुजविले

भाजपच्या संदीप गावडेंचा पुढाकार  सावंतवाडी । प्रतिनिधी गेले काही दिवस मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे बावळाट- केसरी या मुख्यमार्गावरील पुलाला पुराच्या पाण्यामुळे भले मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या दोन दिवसांपासुन ठप्प होती . मात्र , हे भगदाड दुरुस्त करून सदर पुलावर सिमेंटचे काँक्रिटीकरण करून हा मार्ग आता वाहतुकीस खुला झाला आहे. या पुलाला भगदाड […]

बावळाट- केसरी पुलावरील भगदाड बुजविले

भाजपच्या संदीप गावडेंचा पुढाकार 
सावंतवाडी । प्रतिनिधी
गेले काही दिवस मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे बावळाट- केसरी या मुख्यमार्गावरील पुलाला पुराच्या पाण्यामुळे भले मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या दोन दिवसांपासुन ठप्प होती . मात्र , हे भगदाड दुरुस्त करून सदर पुलावर सिमेंटचे काँक्रिटीकरण करून हा मार्ग आता वाहतुकीस खुला झाला आहे. या पुलाला भगदाड पडल्याचे लक्षात येताच तत्काळ याची दखल भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी घेत या मार्गावरील पूल दुरुस्त करून सदरचे भगदाड बुजविण्याचे काम हाती घेतले आहे . या भागातील ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे .
केसरी बावळाट या दोन्ही गावाचा दुवा असलेला हा मार्ग असून गेले दोन दिवस तो बंद होता. आज या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून वाहतूक सुरूही करण्यात आली आहे .आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याअंतर्गत हा रस्ता कऱण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता. सध्या या पुलासह जोड रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुमारे तीन कोटीचा निधी मंजूर आहे. लवकरच पावसाळ्यानंतर या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. श्री गावडे यांनी या पुलाचे काम करून घेत हा मार्ग वाहतुकीस खुला केला आहे .